मुंबई : बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्री विक्की कौशल आणि सारा अली खान यांचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट २ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आता महिनाभरानंतर चित्रपटाच्या कमाईचा वेग बराच मंदावला आहे. विक्की साराचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी प्रभासचा आदिपुरुष देखील प्रदर्शित झाला होता मात्र, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई झाली नाही. याशिवाय हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यात यशस्वी झाला नाही, ज्याचा फायदा 'जरा हटके जरा बचके'ला झाला. पण 29 जुलै रोजी रिलीज झालेल्या 'सत्यप्रेम की कथा'मुळे विक्की साराच्या चित्रपटाची कमाई बरीच मंदावली आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्याला धुमाकुळ घालत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे.
'जरा हटके जरा बचके' एकूण कमाई : 'जरा हटके जरा बचके' 2 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सुमारे 5.25 कोटींची कमाई केली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 30 व्या दिवशी, चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर फक्त 75 लाखची कमाई केली, यासह देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण 30 दिवसांचे कलेक्शन सुमारे 83.78 कोटी झाले आहे. 1 जुलै रोजी 'जरा हटके जरा बचके' ची एकूण हिंदी व्याप्ती 18.93 टक्के होती.
'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाची कहाणी : दरम्यान , आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमी कमाई करत आहे. 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाची कहाणी एका नवविवाहित जोडप्याची आहे. हे जोडपे एका संयुक्त कुटुंबात राहत असतात. या जोडप्याला प्रायव्हसी मिळत नाही त्यामुळे त्यांना एक स्वत:चे घर पाहिजे असते मध्यमवर्गामधील असलेल्या या जोडप्याला घर घेण्यास कठीण जाते. त्यामुळे हे जोडपे भारत सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतून फ्लॅट मिळवण्याचा प्रयत्न करतात. 'जरा हटके जरा बचके' हा रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाने चित्रपट्याच्या बजटच्या डब्बलने कमाई केली आहे.
हेही वाचा :