मुंबई - Yash reacts as three fans die :अभिनेता यश हा कन्नड फिल्म इंडस्ट्री आणि देशभरातील सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा सर्व भाषेमध्ये मोठा चाहता वर्ग आहे. 8 जानेवारी रोजी त्याचा 38 वा वाढदिवस पार पडला. यासाठी कर्नाटकातील गदग जिल्ह्यातील काही चाहत्यांनी त्याचा मोठा कटआउट उभारण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर यशने शोकाकुल कुटुंबियांची भेट घेतली आणि या घटनेबाबत मीडियाशी संवाद साधला.
-
Hope hospitalised fans recover soon 🥺🙏🏻#Yash #Gadag #ToxicTheMovie pic.twitter.com/fIxsoNgoND
— 𝗦𝗵𝗿𝗲𝘆𝗶 ᵀᵒˣᶦᶜ (@NameIsShreyash) January 8, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Hope hospitalised fans recover soon 🥺🙏🏻#Yash #Gadag #ToxicTheMovie pic.twitter.com/fIxsoNgoND
— 𝗦𝗵𝗿𝗲𝘆𝗶 ᵀᵒˣᶦᶜ (@NameIsShreyash) January 8, 2024Hope hospitalised fans recover soon 🥺🙏🏻#Yash #Gadag #ToxicTheMovie pic.twitter.com/fIxsoNgoND
— 𝗦𝗵𝗿𝗲𝘆𝗶 ᵀᵒˣᶦᶜ (@NameIsShreyash) January 8, 2024
यावेळी बोलताना त्याने दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला. स्वतःच्या वाढदिवसाला हा अपघात झाल्याने तोही दुःखी असल्याचं तो म्हणाला. अशा कृती खऱ्या फॅन्डमचे उदाहरण देत नाहीत यावर त्याने भर दिला आणि चाहत्यांनी अशा प्रकारे त्यांचे प्रेम प्रदर्शित करू नये असे आवाहन केले. आपल्या प्रेक्षक आणि समर्थकांनी आपल्याप्रमाणेच जीवनात समृद्ध व्हावे अशी त्याची इच्छा असल्याचे सांगून त्यानं बॅनरचे प्रदर्शन करू नका, बेपर्वा दुचाकी चालवू नका किंवा असुरक्षित सेल्फी घेऊ नका अशी विनंती चाहत्यांना केली.
यशने त्याच्या चाहत्यांना आनंद आणि यश मिळवण्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांना अभिमान वाटावा यासाठी परिश्रमपूर्वक काम करण्याची विनंती केली. त्याची लोकप्रियता प्रदर्शित करण्यासाठी तो त्याच्या चाहत्यांना दुःखी झाल्याचं पाहू इच्छित नाही. पुन्हा कोविडचा उद्रेक होऊ नये यासाठी त्यानं आपला वाढदिवस केवळ कुटुंबासोबत करण्याचा निर्णय घेतल्याचे तो म्हणाला. यशने पीडित कुटुंबाला मदत करणार असल्याचं सांगितलं, परंतु याचा तपशील त्यानं उघड केला नाही.
आपला कटआउट लावताना हाय टेन्शन तारेशी संपर्क आल्याने अपघात झाल्यामुळे तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच यशने चित्रपटाच्या शुटिंगमधून ब्रेक घेतला आणि कुटुंबाच्या सांत्वनासाठी गदग शहराला जाण्यासाठीचा मार्ग पकडला. या अपघातात तीन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यशने त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. दोन चाहते या अपघातात गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येते.
हेही वाचा -