मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आपल्या क्रिएटिव्ह पोस्टर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या अमूलने यावेळी आलिया भट्ट आणि गॅल गडोट यांचे कार्टून बनवले आहे. याशिवाय आलिया आणि गॅलचे हे पोस्टर आता अमूलच्या पेजवर शेअर केले गेले आहे. आलियाचा पहिला हॉलिवूड चित्रपट नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. अमूलच्या पोस्टरमध्ये आलिया आणि गॅल गडोट आकाशातून वाळवंटात पडतात. याशिवाय हीच झलक आलियाच्या चित्रपटामध्ये देखील दाखविली गेली आहे. या सीन दरम्यान दोघींमध्ये वाद देखील होतात,असे दाखविले आहे.
अमूलचे पोस्टर : अमूलच्या पोस्टरमध्ये दोघेही सेल्फी घेताना दिसत आहेत. आलिया भट्ट या चित्रपटात साईड रोलमध्ये आहे मात्र, तिच्या अभिनयाला पसंती दिली जात आहे. या चित्रपटात आलियाची स्क्रीन प्रेझेन्स फारशी नसली तरी, तिच्या अभिनयाचे कौतुक सोशल मीडियावर खूप केले जात आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' चित्रपटात आलियाचे सीन कमी असल्याने भारतीय प्रेक्षक निराश झाले आहेत.
'वंडर वुमन' आलिया भट्ट : पोस्टरमध्ये आलियाची ओळख 'वंडर वुमन' म्हणून करण्यात आली आहे. खरे पाहता गॅल गडोटने डीसीच्या एक्सेटेंड यूनिवर्समध्ये वंडर वुमनची भूमिका साकारली आहे. याशिवाय 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटाचे नावही यामध्ये वापरले आहे. 'अमूल हार्ट ऑफ टेस्ट' असे लिहिले गेले आहे. नेटफ्लिक्स इंडियाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये हे पोस्टर शेअर केले आणि लिहिले, 'दो वंडर्स ज्यांनी आमचे मन वितळले' असे त्यांनी कॅप्शन दिले आहे. 'हार्ट ऑफ स्टोन' चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्ट आणि गॅल गडोटला या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे प्रेम कमी मिळत आहे. या चित्रपटाला प्रतिसाद कमी मिळाल्याने आलियाचे हॉलिवूड पदार्पण धूसर झाले आहे. हा चित्रपट टॉम हार्परने दिग्दर्शित केला असून त्यात जेमी डोर्ननही आहे.
आलिया भट्टची झाले कौतुक : 'हार्ट ऑफ स्टोन'च्या शुटिंग आणि प्रमोशन दरम्यान या दोघी सोबत दिसल्या होत्या. गॅल गडोटने आलियाच्या कौशल्याची प्रशंसा केली आहे. अमेरिकन चित्रपटसृष्टीत आलियाच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला जात आहे. या चित्रपटाचापेक्षा जास्त आलियाचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट चांगलाच बॉक्स ऑफिसवर चालला आहे.
हेही वाचा :