ETV Bharat / entertainment

हृतिक रोशन वाढदिवस : बॉलिवूडच्या ग्रीक गॉडकडे आहेत दोन अ‍ॅक्शनर्स आणि एक सुपरहिरो फ्रँचायझी चित्रपट - Hrithik Roshan next films

Hrithik Roshan birthday : हृतिक रोशन बुधवारी आपला 50 वाढदिवस साजरा करत आहे. 'कहो ना... प्यार है' या चित्रपटामुळे 22 वर्षापूर्वी एका रात्रीत स्टार झाला. आता त्याच्याकडे दोन अ‍ॅक्शनर्स आणि एका सुपरहिरो फ्रँचायझीसह चित्रपटांची भरगच्च लाइनअप आहे.

Hrithik Roshan birthday
हृतिक रोशन 50 वा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 10, 2024, 10:19 AM IST

मुंबई - Hrithik Roshan birthday : बॉलिवूडचा ग्रीक गॉड अशी ओळख असलेला हृतिक रोशन, बुधवारी 50 वर्षांचा झाला आहे. पदार्पणापासून गेली 22 वर्षे तो आव्हानात्मक भूमिका साकारण्याच्या त्याच्या क्षमतेने प्रेक्षकांवर भुरळ घालत आलाय. नृत्यात निपुण असलेल्या हृतिकने अभिनयातही कमाल करुन प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे.

1980 च्या दशकात त्याने 'आप के दिवाने' (1980), 'आशा' (1980), 'भगवान दादा' (1986) अशा बऱ्याच चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. वडील राकेश रोशन यांचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्यानं काम केलंय. 2000 मध्ये त्यानं 'कहो ना... प्यार है' या ब्लॉकबस्टर चित्रपटातून त्यानं रुपेरी पडद्यावर जबरदस्त छाप सोडली आणि त्यानं आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. पहिल्याच चित्रपटानं त्याला रातोरात अफाट लोकप्रिय बनवलं.

हृतिक रोशनला सहा फिल्मफेअर, चार सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचे पुरस्कार, एक सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार आणि एक सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तो सध्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या संपूर्ण बॉलिवूड कारकिर्दीमध्ये त्याने अनेक चढ उतार अनुभवले असूनही त्याच्या फिल्मोग्राफीतील भूमिकांचे वैविध्य हे एक निर्विवाद वैशिष्ट्य ठरलं आहे. त्याने आजवर साकारलेल्या विविध चित्रपटातील भूमिका आणि त्याचे येऊ घातलेले चित्रपट यावर एक नजर टाकूयात.

फायटर

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदचा बहुप्रतिक्षित 'फायटर' या अ‍ॅक्शन चित्रपटाच्या प्रमोशन साहित्यानं प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोव्हर आणि अनिल कपूर यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट आयएएफ अधिकाऱ्याची लढाऊ कथा आहे. येत्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात पहिल्यांदाच हृतिक आणि दीपिका पदुकोण एकत्र काम करत आहेत. या चित्रपटातील 'शेर खुल गए' आणि 'इश्क जैसा कुछ' या गाण्यांनी प्रेक्षकांना आकर्षित केलं आहे.

फायटरचे मोशन पोस्टर स्वातंत्र्यदिनी 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आलं होतं. या चित्रपटात भारतीय वायुसेना (IAF) अधिकाऱ्यांची भूमिका करणाऱ्या अनिल कपूर, दीपिका पदुकोण आणि हृतिक रोशनचा फर्स्ट लूक यातून सर्वांसमोर आला होता. चित्रपटाच्या पहिल्या लूकमध्ये हृतिक भारतीय वायुसेनेच्या गणवेशात शक्तिशाली आणि आकर्षक दिसत होता.

त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचा अधिकृत टीझर रिलीज केला. त्यालाही चाहत्यांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला. फायटर हा चित्रपट भारतातील पहिला हवाई अ‍ॅक्शन पिक्चर असल्याचा प्रचार केला जात आहे.यामध्ये खरेखुरे सुखोई लढाऊ विमाने वापरून भारतीय हवाई सुविधांवर त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

क्रिश ४

खूप विचारानंतर अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या यशस्वी सुपरहिरो फ्रँचायझी क्रिशच्या चौथ्या भागासाठी स्क्रिप्ट फायनल केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2024 च्या पहिल्या सहामाहीत सुरू होणार आहे. चित्रपट फ्रेंचायझीची सुरुवात 'कोई... मिल गया' चित्रपटाने झाली होती. या चित्रपटाला 8 ऑगस्ट 2023 रोजी 20 वर्षे पूर्ण झाली. यात हृतिकने साकारेली विशेष दिव्यांग व्यक्तीची भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहे.

'कोई... मिल गया' चित्रपटानंतर 2006 मध्ये क्रिश आणि 2013 मध्ये क्रिश 3 हे दोन चित्रपट आले. या चित्रपटांपसून हृतिक रोशनच्या नेतृत्वाखालील सुपरहिरो क्रिश फ्रँचायझीने मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. या चित्रपटाच्या चौथ्या भागाची प्रतीक्षा आता प्रेक्षक करत आहेत. या चित्रपटातून प्रियांका चोप्रा तिच्या भूमिकेत पुनरागमन करु शकते. क्रिशच्या साहसातील पुढील प्रकरणाची चाहत्यांना खूप अपेक्षा आहे आणि हा चित्रपट काही काळापासून नियोजनाच्या टप्प्यात आहे.

वॉर 2

हृतिक रोशन मुख्य भूमिकेत असलेल्या 'वॉर' यशस्वी फ्रेंचायझीच्या चाहत्यांना आगामी भागासाठी 2025 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. या चित्रपटात खलनायक म्हणून ह्रतिकच्या विरोधात ज्यनियर एनटीआरला कास्त करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतलाय. हा चित्रपट ज्यु. एनटीआरचा बॉलिवूड पदार्पणाचा चित्रपट असणार आहे. हा चित्रपट 2025 च्या स्वातंत्र्य दिनाला प्रदर्शित करण्याचे नियोजन आहे.

ज्युनियर एनटीआर, कियारा अडवाणी आणि हृतिक रोशन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'वॉर 2' चे दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार आहे. त्याने यापूर्वी ब्रम्हास्त्रचे दिग्दर्शन केले होते. यापूर्वी आलेल्या वॉर प्रीक्वलचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले होते. यात हृतिकने कबीर नावाच्या RAW एजंटची भूमिकी आणि टायगर श्रॉफने सौरभ या RAW एजंटची भूमिका साकारली होती. वाणी कपूरचीही भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. हा चित्रपट 2019 मध्ये रिलीज झाला आणि या अ‍ॅक्शन ड्रामाने अवघ्या सात दिवसांत 200 कोटींची कमाई केली होती. हा त्या विशिष्ट वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला होता.

हृतिकने एक निष्ठावान चाहता वर्ग तयार केला आहे आणि स्टार किड असतानाही आपल्या प्रतिभेच्या जोरावर स्थान निर्माण केलं आहे. त्याला पडद्यावर पाहणे हे प्रेक्षकांसाठी एक पर्वणी असते. त्याचे शरीर सौष्ठव, विदुत वेगाने होणारी अ‍ॅक्शन, नेत्रसुखद नृत्य कौशल्य आणि चतुरस्त्र अभिनय क्षमता यामुळे तो आगामी काळातही आपला जलवा कायम राखेल. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला खूप शुभेच्छा!!

हेही वाचा -

  1. फराह खाननं वाढदिवसानिमित्त शेअर केला एक सुंदर व्हिडिओ
  2. उस्ताद राशिद खान यांचं निधन, संगीत क्षेत्रातला तारा निखळला, कर्करोगाशी झुंज अपयशी
  3. शबाना आझमीसह दिग्गजांनी केले फरहान अख्तरच्या वाढदिवसाचे सेलेब्रिशन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.