मुंबई - नवे पोस्टर रिलीज करुन प्रेक्षकांना चेतवल्यानंतर गदरच्या निर्मात्यांनी 'गदर २' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करणार असल्याचे चाहत्यांना कळवले आहे. सनी देओलने इन्स्टाग्रामवर या थ्रिलर चित्रपटाच्या ट्रेलरची रिलीज तारीख काय असेल हे ओळखायला चाहत्यांना सांगितले आहे. चाहत्यांना अशा पद्धतीने कोडे घालतान सनी देओलने आपले दोन उत्साही मुडमधील फोटो शेअर केले आहेत. त्याने हा फोटो शूट केला त्या लोकेशनचे ठिकाण सांगितलेले नाही. निळ्या ब्लेझरसह तो शर्टमध्ये दिसत असून शुटिंगच्या लोकेशनवरील हा फोटो असल्याचा अंदाज प्रेक्षक बांधत आहेत. फोटो शेअर करत सनीने लिहिलंय, 'ट्रेलर लवकरच येतोय. तारीख ओळखा.'
सनी देओलनेच कोडे घातलंय म्हटल्यावर चाहतेही पेटून उठलेत. भरपूर कमेंट्स आणि इमोजी सनी देओलच्या पोस्टवर प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये येत आहेत. काही तारखा ते देत असून त्यावर त्यांचा विश्वासही आहे. एकाने आत्मविश्वासाने लिहिलंय, '२६ जुलै.' 'अभिनंदन आणि तुमच्या ट्रेलरची आम्ही वाट पाहतोय,' असे एकाने लिहिलंय.
निर्मात्यांनी कालच्या शुक्रवारी रिलीज केलेल्या मोशन पोस्टरमध्ये सनी देओल आणि उत्कर्ष शर्मा दिसत आहेत. झी स्टुडिओजने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये पोस्टर शेअर करताना लिहिले, 'अपने देश और परिवार की रक्षा के लिए, हर चुनौती का सामना करने के लिए तय्यार है तारा सिंग !' गदर '२ आ रह है बडे पर्दे पर लगने इस इंडिपेन्डन्स डे! सिनेमा में ११ ऑगस्ट से.'
सनी देओलचा आयकॉनिक डायलॉग 'हिंदुस्थाँ झिंदाबाद' यासह त्याची उत्कर्ष शर्मासोबत सुंदर केमेस्ट्री मोशन पोस्टरमध्ये दिसत आहे. यात तो राकट दिसत असून त्याने दाढी वाढवली आहे व आक्रमकपणे धावत आहे. उत्कर्ष शर्माने सनी देओल आणि आमिषा पटेल यांच्या मुलाची भूमिका 'गदर : एक प्रेम कथा' या चित्रपटात केली होती. आता २२ वर्षानंतर 'गदर २' चित्रपटातून मोठा झालेला उत्कर्ष मुख्य भूमिकेतून परतणार आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपटात आमिषा पटेलचीही महत्त्वाची भूमिका आहे.
'गदर २' चित्रपटाच्या निर्मात्यांनी अलिकडेच एक टिझरही रिलीज केला होता. यामध्ये 'गदर : एक प्रेम कथा' चित्रपटातील 'घर आजा परदेसी', या गाण्याचे सॅड व्हर्जन ऐकायला मिळाले होते.
हेही वाचा -
१. Mahesh Babu with family : महेश बाबू फॅमिलीसह अज्ञातस्थळी रवाना, पत्नी, मुलांसह विमानतळावर स्पॉट
२. Sara Ali Khan : सारा अली खानची अमरनाथ यात्रा, पाहा व्हिडिओ