ETV Bharat / entertainment

Welcome to the Jungle teaser : अक्षय कुमारनं स्वतःला आणि चाहत्यांना दिली वाढदिवसानिमित्त खास भेट; 'वेलकम टू द जंगल'चा टीझर प्रदर्शित... - वेलकम टू द जंगलचा टिझर प्रदर्शित

Welcome to the Jungle teaser : अक्षय कुमारनं त्याच्या 56 व्या वाढदिवसानिमित्त 'वेलकम टू द जंगल'चा टीझर प्रदर्शित केला आहे. हा चित्रपट 2024 मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

Welcome to the Jungle teaser
वेलकम टू द जंगलचा टीझर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 5:35 PM IST

मुंबई Welcome to the Jungle teaser : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आज त्याचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं सेलिब्रिटींसह चाहते त्याचं अभिनंदन करत आहेत. अक्षय कुमारनं त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मेजवानी दिली आहे. त्यानं त्याच्या वाढदिवसानिमित्त 'वेलकम टू द जंगल' (वेलकम 3) चा मजेदार टीझर प्रदर्शित केला आहे. यासोबतच चित्रपटाची रिलीज डेट आणि स्टार कास्टही समोर आली आहे. 'वेलकम' फ्रँचायझीचा तिसरा पार्ट 'वेलकम टू द जंगल' आहे. हा चित्रपट '20 डिसेंबर 2024' ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमद खान करणार आहे. 'वेलकम टू द जंगल'मध्ये अनेक कलाकार असणार आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अक्षय कुमारने 'वेलकम टू द जंगल'चा टीझर केला रिलीज : 'वेलकम टू द जंगल'च्या टीझरबद्दल सांगायचं तर हा टिझर खूप खास दिसत आहे. टीझरची सुरुवात ही जंगलापासून होते. या टिझरमध्ये चित्रपटामधील संपूर्ण स्टार कास्ट सैनिकांचा ड्रेस परिधान करून 'वेलकम 3'चं शीर्षक गीत गाताना दिसत आहेत. चित्रपटाच्या टिझरमध्ये दिशा पटानी आणि अक्षय कुमार यांच्यात भांडण होताना दाखवलं आहे. या भांडणात रवीना टंडन ही हस्तक्षेप करताना दिसत आहे. या चित्रपटाची कहाणी काय असणार हे सध्या समजलं नाही, मात्र या चित्रपटात प्रचंड कॉमेडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

'वेलकम 3' च्या स्टारकास्टचाही झाला खुलासा : वेलकम फ्रँचायझीचे पहिले दोन भाग सुपरहिट झाले होते आणि आता 'वेलकम टू द जंगल' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर येणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट टीझरच्या माध्यमातून समोर आली आहे. 'वेलकम टू द जंगल'मध्ये अक्षय कुमार, दिशा पटानी, रवीना टंडन, जॅकलिन फर्नांडिस, परेश रावल, राजपाल यादव, सुनील शेट्टी, संजय दत्त, जॉनी लिव्हर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा, अर्शद वारसी, दलेर मेहंदी, मिका सिंग, यांच्या भूमिका आहेत. याशिवाय या चित्रपटात लारा दत्ता, मुकेश तिवारी, शारीब हाशिम, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, राहुल देव, झाकीर हुसेन, यशपाल शर्मा यांच्यासह अनेक स्टार्स खळबळ माजवणार आहेत. विशेष म्हणजे रवीना टंडन आणि अक्षय कुमार बऱ्याच काळानंतर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. Brahmastra part 2 dev : अयान मुखर्जी लवकरच घेऊन येणार 'ब्रह्मास्त्र पार्ट 2 - देव'; सोशल मीडियावर पोस्ट केली शेअर...
  2. Akshay Kumar Birthday : अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्या विशेष चित्रपटांबद्दल...
  3. Shahrukh Khan And Anand Mahindra : नैसर्गिक संसाधन घोषित केल्याबद्दल शाहरुख खानने उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे मानले आभार...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.