मुंबई - विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे ( Vijay Deverakonda-Ananya Panday starrer ) यांच्या भूमिका असलेल्या 'लायगर' ( Liger ) चित्रपटामधील तिसरे गाणे आफत ( Aafat ) अखेर रिलीज झाले आहे! या गाण्यात या दोघांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची झलक पाहायला मिळत आहे.
आफत हा तनिष्क बागची आणि जहरा खान यांनी गायलेला रोमँटिक ट्रॅक आहे. रश्मी विराग यांनी लिहिलेल्या या गाण्याचे संगीतकार तनिष्क देखील आहेत. गाण्यातील विजय आणि अनन्याची सहज केमिस्ट्री तुम्हाला पडद्यावरून नजर हटवू देणार नाही.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दरम्यान, लायगरला सेन्सॉरकडून यूए प्रमाणपत्र देण्यात आले आहे. चित्रपटाचा रनटाइम 2 तास 20 मिनिटांचा आहे, पहिला अर्धा भाग 1 तास 15 मिनिटांचा आणि दुसरा अर्धा भाग 1 तास 5 मिनिटांचा आहे. चित्रपटात सात फायटींग आणि सहा गाणी आहेत, अशी माहिती प्रॉडक्शन हाऊसच्या सूत्रांनी दिली.
पुरी जगन्नाध यांनी दिग्दर्शित केलेला, हा चित्रपट एक स्पोर्ट्स अॅक्शन चित्रपट आहे जो या वर्षी 25 ऑगस्ट रोजी हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळममध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्माते सध्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत.
धर्मा प्रॉडक्शनने अलीकडेच ट्रेलर आणि चित्रपटातील दोन गाण्यांचे अनावरण केले होते ज्यांना प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट विजयचे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण आणि अनन्याचा पहिला बहुभाषिक चित्रपट आहे.
लायगर व्यतिरिक्त अनन्या 'खो गये हम कहाँ' मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि गौरव आदर्शसोबत दिसणार आहे. दुसरीकडे विजय सामंथा रुथ प्रभूसोबत 'खुशी' या बहुभाषिक चित्रपटात देखील दिसणार आहे, जो 23 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - 'गोष्ट एका पैठणी'ची फेम सुव्रत जोशीसोबत खास बातचीत