ETV Bharat / entertainment

Sunny Leone hugs Anurag Kashyap : केनेडीला मिळालेल्या 7 मिनिटांच्या स्टँडिंग ओव्हेशननंतर सनी लिओनीला अश्रू अनावर - केनेडी चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये केनेडी या चित्रपटाला 7 मिनिटांचा दीर्घ स्टँडिंग ओव्हेशन मिळाल्यानंतर सनी लिओनीला अश्रू अनावर झाले. सनीने उत्स्फूर्त प्रतिसादाने भावूक झालेल्या अनुराग कश्यप आणि इतर क्रू सदस्यांना मिठी मारली.

Sunny Leone hugs Anurag Kashyap
सनी लिओनीला अश्रू अनावर
author img

By

Published : May 26, 2023, 1:01 PM IST

मुंबई - अनुराग कश्यप दिग्दर्शित केनेडी या चित्रपटाचा 76 व्या कान्स चित्रपट महोत्सवात प्रीमियर पार पडला. या चित्रपटाला कान्समधील ग्रँड ल्युमिएर थिएटरमध्ये प्रेक्षकांकडून सात मिनिटांचा स्टँडिंग ओव्हेशन मिळाला. फेस्टिव्हलच्या यूट्यूब चॅनेलने केनेडीच्या प्रीमियरच्या ठिकाणाहून एक व्हिडिओ अपलोड केला आहे. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवताच चित्रपटातील कलाकार राहुल भट आणि सनी लिओन भावूक झाले, तर अनुरागच्या चेहऱ्यावर सर्वात मोठे हास्य दिसत होते.

सनी लिओनी अनुराग कश्यपला धीर दिला - उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी चित्रपटाच्या टीमचे जोरदार स्वागत केले. यावेळी भारावलेल्या अनुरागच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते. दरम्यान, सनीने अनुरागला धीर दिला, तू हे करुन दाखवलेस', असे ती म्हणताच अनुराग म्हणाला, 'तुझ्या डोळ्यात अश्रू आहेत'. त्यावर सनी म्हणाला, 'हो, पण मी रडत नाही आहे.' त्यानंतर टीमने एकमेकांना मिठी मारून शुभेच्छा दिल्या.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अनुरागने निर्मात्याचा घेतला आशीर्वाद - ग्रँड रिसेप्शननंतर अनुरागने चित्रपट निर्माते सुधीर मिश्रा यांना थिएटरमध्ये शोधले आणि त्यांचा चरण स्पर्श केला. यानंतर दोघांनीही उबदार मिठी मारली. सुधीरने अनेक वर्षांपूर्वी अनुरागला सांगितलेल्या केनेडी या चित्रपटाच्या कथेमुळे अनुराग प्रेरित झाला होता.

राहुल भट्टची भूमिका साकारणार होता विक्रम - कान्स 2023 मधील उपस्थितांनी सोशल मीडियावर कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले. केनेडी चित्रपटामध्ये राहुलला एका हत्याकांडाच्या माजी पोलिसाच्या मुख्य भूमिकेत साकारले आहे, ही भूमिका अनुरागने मूळतः पोनियिन सेल्वन फेम चियान विक्रमसाठी लिहिली होती.

नुकत्याच झालेल्या संवादादरम्यान, गँग्स ऑफ वासेपूरच्या दिग्दर्शक अनुराग कश्यपने एका मीडिया पोर्टलला माहिती दिली की केनेडी या चित्रपटातील मुख्य भूमिका विक्रमला डोळ्यासमोर ठेवून लिहिली आहे, परंतु काही कारणाने तो त्याच्याशी संपर्क करु शकला नव्हता. म्हणून त्याने राहुलला या भागामध्ये ठेवले. विक्रमने नंतर सांगितले की, अनुरागला त्याला कास्ट करण्यात रस असल्याचे कळल्यानंतर त्याने नंतर दिग्दर्शकाशी संपर्क साधला होता. मात्र, त्यावेळी चित्रपटाच्या शूटिंगला केवळ एक महिना बाकी होता आणि सर्व काही तयार झाले होते. राहुलने नंतर सांगितले की, विक्रमने ही भूमिका न केल्यामुळेच ती मला मिळाली. त्यामुळे त्याचे मला आभार मानायचे आहेत.

हेही वाचा - Salmans Bodyguard Pushes Vicky : सलमानच्या बॉडीगार्डने विक्कीला ढकलले, आयफा २०२३ मधील व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.