चेन्नई - दक्षिण भारतातील चित्रपट जेव्हा रिलीज होतात तेव्हा त्यातील कलाकार, दिग्दर्शक यांचे फॅन्स जल्लोष साजरा करतात. याचा पुन्हा एकदा अनुभव मणिरत्नमच्या ( Mani Ratnam ) पोन्नियिन सेल्वन ( Ponniyin Selvan ) चित्रपटाच्या रिलीजच्या प्रसंगी आला. आज रिलीजच्या पूर्वी तामिळनाडूमध्ये, चेन्नईच्या कोयंबेडू येथील रोहिणी सिल्व्हर स्क्रीन चित्रपटगृहाबाहेर चाहते मोठ्या संख्येने जमले होते. ढोल, ताशे, हलगी यांचा ताल धरला गेला होता आणि याच ठेक्यावर चाहते बेहोश होऊन नाचत होते.
PS1 हा एक ऐतिहासिक नाट्यमय चित्रपट आहे. जेव्हा चोल साम्राज्य त्याच्या शक्तीच्या शिखरावर होते, तेव्हाची कता यात मांडण्यात आली आहे. हा चित्रपट राजघराण्यांमधील सत्ता संघर्षाचे अनुसरण करतो कारण सैन्याने चोल सिंहासन काबीज करण्याचा कट रचलेला असतो. पोनियिन सेल्वन चित्रपटात त्या वेळी अस्तित्त्वात असलेल्या वास्तविक जीवनातील पात्रांची नावे वापरली आहेत परंतु घटना मोठ्या प्रमाणात काल्पनिक आहेत.
ही कथा 10 व्या शतकात चोल साम्राज्यातील अशांत काळात सेट केली गेली आहे जेव्हा सत्ताधारी कुटुंबाच्या विविध शाखांमधील सत्ता संघर्षामुळे शासक सम्राटाच्या संभाव्य उत्तराधिकारी यांच्यात हिंसक मतभेद निर्माण झाले होते. ए.आर. रहमान यांचे म्युझिक असलेला हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नडमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहे. मद्रास टॉकीज आणि लायका प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे.
मदुराईमध्ये, चित्रपट रिलीजपूर्वी चाहत्यांनी दूध अर्पण केले आणि अभिनेता कार्तीच्या पोस्टरभोवती हार घालून पूजा केली. यावेळी जोरदार फटाके वाजवण्यात आले.
रविवर्मन यांना ‘उत्कृष्ट’ सिनेमॅटोग्राफीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळावा, असेही सिनेरसिकांनी म्हटले आहे. चित्रपट रसिकांनी असेही म्हटले आहे की बाहुबलीशी तुलना केली नाही तर PS1 एक चांगला सिनेमॅटिक अनुभव असेल.
या चित्रपटात विक्रम आदित्य करिकलनची भूमिका साकारणार आहे. विक्रम व्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चन दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. मणिरत्नम दिग्दर्शित, पोन्नियिन सेल्वन हा पॅन इंडिया चित्रपट आहे. हा चित्रपट लेखक कल्की कृष्णमूर्ती यांच्या त्याच नावाच्या तमिळ कादंबरीचे सिनेमॅटिक रूपांतर आहे जी 1950 च्या दशकात मालिकेच्या रूपात प्रदर्शित झाली होती.
हेही वाचा - Vikram Vedha Twitter Review:दिग्दर्शकाच्या सिनेमॅटिक कल्पकतेने झळाळले ह्रतिक सैफचे तेज