मुंबई - Arbaaz-Sshura: सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नवविवाहित जोडपे अरबाज खान आणि शूरा खानचा आहे. अरबाज त्याची पत्नी शूरा खानला एक सुंदर फ्लाइंग किस देऊन त्याचे प्रेम व्यक्त करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. दोघेही नुकतेच सुट्टी एन्जॉय करून मायदेशी परतले आहेत. हे जोडपे मुंबई विमातळावर स्पॉट झाले. अरबाजनं 24 डिसेंबर 2023 रोजी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थित मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केलं होतं. नवीन वर्षाची सुट्टी आणि हनिमून आटोपून हे जोडपे शुक्रवारी मुंबईत परतले आहे.
अरबाज खानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : व्हिडिओमध्ये अरबाज हा पतीला प्रेमानं बोलवताना दिसत आहे. शूरा खाननं तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या फॉलोअर्ससाठी पती अरबाज खानसोबतचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. शूराला अरबाजनं मुलगा अरहान खान आणि बहीण अर्पिता खान शर्मा यांच्या उपस्थितीत अंगठी देऊन प्रपोज केलं होतं. दरम्यान, आणखी एक बातमी आता समोर येत आहे. अरबाजनं दुसऱ्या लग्नानंतर मलाइकाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. अरबाज फक्त 127 इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करतो, ज्यामध्ये मलायकाचा देखील समावेश होता. मात्र आता ती या लिस्टमध्ये दिसत नाही. मलायका अजूनही अरबाजला फॉलो करत आहे.
मलायका अरोरा आणि अरबाज खान 1998 मध्ये विवाहबद्ध झाले. मे 2017 मध्ये या जोडप्याचा अधिकृतपणे घटस्फोट झाला. एका खास मुलाखतीत अरबाजचे वडील सलीम खान यांनी लग्नाविषयी बोलताना सांगितलं की, 'तो आपल्या मुलासाठी आनंदी आहे. दुसरीकडे मलायकानेही 'झलक दिखला जा'च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अरबाज आणि मलायकाच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'काल त्रिघोरी'मध्ये दिसला होता. आता पुढं तो 'दंबग 4' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तर मलायका 'पटाखा' चित्रपटामध्ये शेवटी दिसली होती.
हेही वाचा :