ETV Bharat / entertainment

बॉलिवूड सेलेब्रिटिजसह क्रिकेटर्सनाही आवडला 'लाल सिंग चड्ढा' - Lal Singh Chadha Box Office

आमिरचा लाल सिंग चड्ढा चित्रपट पहाण्याचे आवाहन काही सेलेब्रिटी करताना दिसत आहेत. यात वीरेंद्र सेहवाग आणि सुरेश रैना यांचाही समावेश आहे. दोघांचा चित्रपट पाहण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ आमिर खान प्रॉडक्शनने पोस्ट केला आहे.

बॉलिवूड सेलेब्रिटिजसह क्रिकेटर्सनाही आवडला 'लाल सिंग चड्ढा'

author img

By

Published : Aug 11, 2022, 2:51 PM IST

Updated : Aug 11, 2022, 3:08 PM IST

मुंबई - आमिर खानचा बहुप्रतीक्षित लाल सिंग चड्ढा अखेर रिलीज झाला आहे. चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या समिक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाबाजूला लाल सिंग चड्ढा चित्रपटाची टीम आणि आमिर खान चित्रपटाच्या जोरदार प्रचारात गुंतला असताना पहिल्या दिवशी मोठ्या कमाईची अपेक्षा ठेवली जात होती. मात्र देशभर पहिल्या दिवशी मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता मोठ्या ओपनिंगची शक्यता कमी वाटते.

आमिरच्या लाल सिंग चड्ढा चित्रपट पहाण्याचे आवाहन काही सेलेब्रिटी करताना दिसत आहेत. यात वीरेंद्र सेहवाग आणि सुरेश रैना यांचाही समावेश आहे. दोघांचा चित्रपट पाहण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ आमिर खान प्रॉडक्शनने पोस्ट केला आहे.

''आमिर खानचा चित्रपट बघायला जात असताना परफॉर्मन्सचा विचारच करायची गरज नाही. बाकी कलाकारांनीही कमालीच्या भूमिका साकारल्या आहेत. मला तर खरंच खूप आवडला चित्रपट'', असे म्हणताना वीरेंद्र सेहवाग दिसत आहे.

''चित्रपटाची सुंदर संकल्पना बनवली आणि इतकी मेहनत केलीय, सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुंदर प्रेमकथेसह यात खूपच सुंदर गाणी आहेत. मजा आली, आमिरभाईला शुभेच्छा'', असं म्हणताना सुरेश रैना दिसत आहे.

दरम्यान बॉलिवूड सेलेब्रिटीही चित्रपट पाहण्याचे आवाहन करत आहेत. माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनने चित्रपट पाहून आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, ''किती सुंदर परफॉर्मन्सेस!! संपूर्ण टीमचे अभिनंदन #LaalSinghCaddha चित्रपट आवडला!!''

क्रिकेट कॉमेंटिटर आणि भारताचा माजी कसोटीपटू आकाश चोप्रानेही चित्रपट आवडल्याचे म्हटले आहे.''काल रात्री #LaalSinghCaddha पाहिला. आमिरचा किती महान परफॉर्मन्स आहे...त्याच्या सर्वोत्कृष्टपैकी एक. ( लगान, गजनी, दंगल इ.) चित्रपट खूप काही सांगतो. चित्रपट तुमच्यासोबत वाढतो आणि तुम्ही लाल सिंगच्या प्रेमात पडता.'' असे त्याने लिहिलंय.

हेही वाचा - टायगरल श्रॉफ करतोय 'कॅसोनोव्हा' गर्ल आकांक्षा शर्मासोबत डेटिंग? जाणून घ्या सत्य...

Last Updated : Aug 11, 2022, 3:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.