मुंबई : प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान यांचा 'आदिपुरुष' हा चित्रपट शुक्रवारी सकाळी फार भव्यतेने रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. ओम राऊत दिग्दर्शत हा चित्रपट पहिल्या टीझरपासून वादात सापडला आहे. तरीही या चित्रपटतची अॅडवान्स बुकिंग फार जास्त प्रमाणात प्रेक्षकांनी केली असे दिसून येत आहे. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस निकालांवर अंदाज लावणे सध्याला कठीण असले तरी, सिनेमा थिएटरमध्ये चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या हळूहळू प्रतिक्रिया या सोशल मीडियावर बघायला मिळत आहे. सध्याला चित्रपटाच्या प्रीमियरमधील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'आदिपुरुष' चित्रपट बघायला आला माकड : हा व्हिडिओ सोशल मीडिया वापरकर्त्याने शेअर केला असून या व्हिडिओमध्ये, एक माकड थिएटरमधील खिडकीसारख्या असणाऱ्या जागी बसून 'आदिपुरुष' हा चित्रपट बघताना दिसत आहे. त्यानंतर तिथेल असणाऱ्या प्रेक्षकांनी ओरडा केला आणि काहीजणांनी जय श्री राम गाणे देखील म्हटले आहे. रुपेरी पडद्यावर 'आदिपुरुष' चित्रपट बघणाऱ्यांना प्रेक्षकांना या माकडाने भगवान हनुमानाची आठवण करून दिली आहे. यापुर्वी 'आदिपुरुष' दिग्दर्शक ओम राऊत यांनी थिएटर मालकांना भगवान हनुमानाच्या नावाने एक जागा आरक्षित करण्याची विनंती केली आहे. राऊत यांनी भगवान हनुमानाला एक जागा आरक्षित करण्याची विनंती ही तिरुपती येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात केली होती.
-
Hanuman Jii watching Movie 🥰🥰🥰🥰😍😍😍
— iamRashmika (@iamRashmikaArmy) June 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
JAI SRI RAM🙏#Adhipurush @PrabhasRaju @omraut jii you said for Hanuman Jii keliae ak seat hona real now Hanuman Jii came to watch movie
JAI SRI RAM🙏#HANUMAN #JaiSriRam @TSeries @UV_Creations @peoplemediafcy @AdhipurushFlim pic.twitter.com/95F14BGr1o
">Hanuman Jii watching Movie 🥰🥰🥰🥰😍😍😍
— iamRashmika (@iamRashmikaArmy) June 16, 2023
JAI SRI RAM🙏#Adhipurush @PrabhasRaju @omraut jii you said for Hanuman Jii keliae ak seat hona real now Hanuman Jii came to watch movie
JAI SRI RAM🙏#HANUMAN #JaiSriRam @TSeries @UV_Creations @peoplemediafcy @AdhipurushFlim pic.twitter.com/95F14BGr1oHanuman Jii watching Movie 🥰🥰🥰🥰😍😍😍
— iamRashmika (@iamRashmikaArmy) June 16, 2023
JAI SRI RAM🙏#Adhipurush @PrabhasRaju @omraut jii you said for Hanuman Jii keliae ak seat hona real now Hanuman Jii came to watch movie
JAI SRI RAM🙏#HANUMAN #JaiSriRam @TSeries @UV_Creations @peoplemediafcy @AdhipurushFlim pic.twitter.com/95F14BGr1o
भगवान हनुमानासाठी एक जागा आरक्षित : या विनंतीचे पालन करून, थिएटर मालकांनी भगवान हनुमानाच्या सन्मानार्थ जागा बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट भारतीय महाकाव्य रामायणाचे रूपांतर आहे. या चित्रपटात प्रभास हा राघवच्या भूमिकेत आणि क्रिती सेनेन ही जानकीच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटात सैफ अली खान हा लंकेश, सनी सिंग लक्ष्मणच्या भूमिकेत असून देवदत्त नागे हा भगवान हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'आदिपुरुष' चित्रपट हा प्रभाससाठी फार महत्त्वाचा मानला जात आहे, कारण या चित्रपटासाठी प्रभास आपला फार वेळ दिला आहे. हा चित्रपट निर्मित करण्यासाठी 500 कोटी लागले आहे. भूषण कुमारची टी-सिरीज आणि रेट्रोफाईल्स या चित्रपटाला को-फंड करत आहेत.
हेही वाचा :