ETV Bharat / entertainment

Vikrant Massey Interview :'12th Fail'चा नायक विक्रांत मॅसीही झाला होता नापास, प्रेरणादायी व्यक्तींची सांगितली नावं - विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित 12th Fail

Vikrant Massey Exclusive Interview : विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12th Fail' हा चित्रपट सध्या देशभरातील प्रेक्षकांचं लक्ष वेधत आहे. या चित्रपटाचं कथानक प्रेक्षकांना प्रेरणादायी वाटतंय. हालाकीच्या परिस्थितीत युपीएससी सारखी कठीण परीक्षा देण्याची तयारी करणाऱ्या तरुणाच्या संघर्षावर आधारित ही सत्यकथा आहे. यातील विक्रांत मॅसीनं साकारलेली नायकाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. या चित्रपटाविषयी विक्रांतन आमच्या प्रतिनिधीशी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.

Vikrant Massey Interview
12th Fail चा नायक विक्रांत मॅसी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 9:52 AM IST

Updated : Nov 6, 2023, 12:26 PM IST

मुंबई - Vikrant Massey Exclusive Interview : अलिकडेच '12th Fail' हा विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित आणि निर्मित चित्रपट प्रदर्शित झाला आणि अनपेक्षितपणे त्याला प्रेक्षकाचा उदंड प्रतिसाद मिळू लागला. कुठलाही मोठा स्टार ऍक्टर नसलेला आणि अत्यंत गरीब माणसाच्या शिक्षणासाठी चाललेल्या धडपडीवर आधारित कथानकावर बेतलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतकं यश मिळवंल असं कुणालाही वाटलं नव्हतं. परंतु हल्ली प्रेक्षक चांगल्या कथानकाला पसंती देतात आणि 12th Fail या प्रामाणिकपणे बनविलेल्या सिनेमालाही त्यांनी उचलून धरलंय. महत्वाचं म्हणजे हा चित्रपट पॅन इंडिया सिनेमा असून हिंदी बरोबरच तो तामिळ, तेलगू आणि कन्नड भाषेतही रिलीज करण्यात आला. या चित्रपटाचे यश साजरं करण्यासाठी मेकर्सनी सक्सेस पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला सिनेमाच्या स्टार कास्ट बरोबर अनेक सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती. आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्याबरोबर '12th Fail' चा मुख्य कलाकार विक्रांत मॅसीने दिलखुलास गप्पा मारल्या, त्यातील काही अंश....

सर्वप्रथम 12th Fail च्या अभूतपूर्व यशाबद्दल अभिनंदन...
थँक यू सो मच.....

हा चित्रपट शैक्षणिक विषयावर आधारित आहे. तुझ्या शैक्षणिक जीवनाबद्दल काय सांगशील?
मी शाळेत असताना फारसा हुशार विद्यार्थी नव्हतो. एक साधारण विद्यार्थी होतो. माझं मन अभ्यासात नाही तर नाटक, नृत्य यात रमायचे. घरच्यांनाही माहित होतं की हा त्याच क्षेत्रात काही तरी करेल. मी धक्के खात शिकलो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कॉलेजातही तसंच होतं. जेमतेम पासिंग पुरते मार्क्स मिळायचे. मी तर १३ वीत फेल देखील झालो होतो. परंतु वडिलांनी सांगितले की पुढे काहीही कर, परंतु ग्रॅड्युएटचा शिक्का लावून घे. प्रत्येक मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये जे सल्ले दिले जातात ते मला मिळालेले आहेत.

आमच्या घरची परिस्थिती बेताची होती. वडील काम करायचे. आई सकाळी ४ ला उठून ऑफिसवाल्यांसाठी डबे बनवायची आणि नंतर शिकवण्या घ्यायची. तेवढाच घराला आर्थिक लाभ व्हायचा. मी देखील वयाच्या १५-१६ व्या वर्षांपासून टेलिव्हीजनवर काम करू लागलो. मित्र खेळायला बोलवायचे परंतु मी 'कामावर' जातोय असे सांगत असे. तेव्हा थोडं खटकलं असंल नसंल, परंतु मला समाधान आहे की तरुण वयात मी कौटुंबिक जबाबदाऱ्या उचलत आलोय.

मध्यम वर्गात जन्मल्याने आत्मनिर्भर कसे बनावं हे आपसूक कळलं. मी घरात केर काढणं, भांडी घासणं, अशी कामे करीत असे. माझ्या '12th Fail' च्या रोलचे ट्रेनिंग तेव्हापासूनच सुरु होतम, असम म्हणता येईल (हसतो). हा चित्रपट यूपीएससीमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणत्या दिव्यातून जावम लागतम याबाबतीत आहे. आय पी एस ऑफिसर मनोज शर्मा आणि आय आर एस ऑफिसर श्रद्धा जोशी यांच्या जीवनावर आधारित '12th Fail' हा सिनेमा आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिकतेनं त्यांचं जीवन पडद्यावर उतरविण्याचा प्रयत्न केला आणि तो सफल झालाय असं वाटतंय. यूपीएससीची परीक्षा ही जगातील दुसरी सर्वात कठीण परीक्षा आहे. आर्थिक दुर्बल वर्गातील जवळपास २५ % मुले याचा ध्यास घेतात. जो सर्व परिस्थितीतून तावून सुलाखून निघतो तो नक्की तरतो.

ही भूमिका तुझ्याकडे कशी आली?
त्यात योगायोग आहे. 'थ्री इडियट्स' हा चित्रपट येऊन गेला जो शैक्षणिक पद्धतीवर आधारित होता. त्याचे निर्माते होते विधू विनोद चोप्रा आणि तो दिग्दर्शित केला होता राजू हिराणी यांनी. '12th Fail' हादेखील शैक्षणिक विषयावर आधारित आहे. त्याचं दिग्दर्शन केला आहे विधू विनोद चोप्रा यांनी आणि राजू हिराणी यांनी माझं नाव सुचवलं. माझे भाग्य आहे की हा चित्रपट मला मिळाला.

विधू विनोद चोप्रा यांचा भर रियल गोष्टींवर आहे. त्यांना प्रत्येक ठिकाणी ऑथेन्टिसिटी हवी असते. त्यांच्या 'मिशन कश्मीर' साठी त्यांना सीनमध्ये बॉम्ब ब्लास्ट हवा होता तेव्हा त्यांनी खरा बॉम्ब ब्लास्ट करून शूट केले. मला या सिनेमासाठी ८-९ किलो वजन कमी करावे लागले. मला माझा रंग सावळा करावा लागला. शूट सुरु होण्याआधी मी घरी गेलो होतो. सकाळी मोहरीचे तेल लावून गच्चीवर जाऊन उन्हात तासनतास बसायचो, तेव्हाकुठे चोप्राजींना अपेक्षित स्किन टोन मिळाला. परंतु 'एव्हरीथिंग वॉज वर्थ इट'. आज त्या मेहनतीचे चीज झाले आहे हे बघून आनंद वाटतोय.

तुझ्या आयुष्यात प्रेरणा देणाऱ्या व्यक्ती कोण?
सुरुवात करायची झाली तर आई वडील. त्यांचे सगळेच प्रेरणादायी आहे. या क्षेत्रात मला दिवंगत इरफान खान प्रेरणादायी वाटत आलाय. त्याच्याकडे टॅलेंटची खाण होती परंतु चाळीशी उलटल्यानंतर त्याची वाहवाही झाली. त्याची चिकाटी आणि त्याचा संघर्ष, आत्मविश्वास मला प्रेरणादायी वाटतो. स्पोर्ट्समध्ये मला राहुल द्रविडची कन्सिस्टन्सी भावते. मला अटल बिहारी बाजपेयी यांच्या कविता इन्स्पायरिंग वाटतात. मला मनमोहन सिंग यांची बुद्धिमत्ता प्रेरित करते. या लोकांकडे राजकारणी म्हणून न बघता मी त्यांच्याकडे व्यक्ती म्हणून बघतो. मला आमिर खानसुद्धा प्रभावित करतो, त्याच्या सिनेमांमधून. मलादेखील सामान्य माणसाला रीप्रेझेन्ट करायला आवडते. मला त्यांच्या आवाजाचा आवाज बनायला आवडेल.

हेही वाचा -

1. Anushka Sharma on Virat Kohli : 'विराट' खेळीनंतर नवऱ्यासाठी अनुष्का शर्माची खास पोस्ट; बर्थडे पर खुद को...

2. Randeep and Lin Wedding: रणदीप हुड्डा लवकरच करणार गर्लफ्रेंड लिन लैश्रामशी लग्न

3. Singham Again: 'सूर्यवंशी' या चित्रपटाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अक्षय कुमारचा 'सिंघम अगेन'मधील फर्स्ट लूक प्रदर्शित

Last Updated : Nov 6, 2023, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.