मुंबई - बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा बाहुबली अभिनेत्री तमन्ना भाटियाला डेट करत असल्याची माहिती आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की विजयने त्याच्या लेडीलव्हसाठी एक प्रेमळ टोपणनाव ठेवले आहे? दोन्ही कलाकारांनी अद्याप त्यांच्या कथित रोमान्सची उघड कबुली दिलेली नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीला दोघांचे चुंबन दृष्य व्हायरल झाल्यानंतर या चर्चेचे पेव फुटले होते. विजय मात्र त्याच्या गूढ पोस्ट्सने चाहत्यांना अंदाज बांधण्याची संधी देत राहतो आणि नुकत्याच चाहत्यांसोबत ऑनलाइन झालेल्या चिट-चॅट दरम्यान त्याने तसेच केले.
विजय वर्माचे 'आस्क मी सेशन' - सोमवारी विजयने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांशी संपर्क साधला. त्याने चाहत्यांसाठी आस्क मी सेशन आयोजित केले आणि त्याच्या चाहत्यांना जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. करीना कपूर खानसोबत आगामी चित्रपटात काम करण्याच्या त्याच्या अनुभवापासून ते लस्ट स्टोरीज 2 चा ट्रेलर सोडण्यापर्यंत, विजयच्या चाहत्यांना काही मनोरंजक प्रश्न विचारायचे होते. लस्ट स्टोरीज 2 बद्दल बोलायचे झाले तर, नेटफ्लिक्स अँथॉलॉजीमध्ये विजय आणि त्याची कथित असलेली लेडीलव्ह तमन्ना भाटिया एकत्र दिसणार आहे.
टमाटर काय आहे? चाहते संभ्रमात - चाहत्यांसह ऑनलाइन प्रश्नोत्तर सत्रादरम्यान, विजयने स्पष्टपणे सांगितले की तमन्ना ही त्याची 'पसंती' आहे. जो या जोडप्याला चांगल्या प्रकारे ओळखतो त्यांच्याकडून किंवा तमन्नाने स्वतःहून विचारलेल्या प्रश्नांपैकी एक प्रश्न: 'तुम्हाला टमाटर आवडतात?' ज्याला विजयने दोन टोमॅटो इमोजीसह 'माय फेव्ह' असे उत्तर दिले. या 'टमाटर'चा अर्थ काही चाहते अजूनही शोधत आहेत.
चाहत्यांना साक्षात्कार - फेब्रुवारीमध्ये, विजयची क्राईम ड्रामा मालिका 'दहाड'चा बर्लिन चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाला. विजय, सोनाक्षी सिन्हा आणि 'दहाड' टीमने फिल्म फेस्टमध्ये प्रीमियरला हजेरी लावली होती. त्यानंतर, तमन्ना संपूर्ण टीमला इन्स्टाग्राम स्टोरीजवर शुभेच्छा दिल्या. यानंतर विजयने तिला 'धन्यवाद टमाटर' असे लिहिून पोस्ट पुन्हा शेअर केली. आता हे मजेशीर टोपणनाव विजयने तमन्ना भाटियासाठि निवडले असल्याचा साक्षात्कार चाहत्यांना झाला आहे.
हेही वाचा - Bholaa Box Office Collection Day 5: भोला चित्रपटाच्या कमाईची गती वाढली, ५० कोटीपर्यंत पोहोचला आकडा