मुंबई - सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या विशेषतः सेलेब्रिटीजना त्यांच्या मनासारखे व्यक्त होता येईलच असे नाही. जेव्हा कधी आपल्यातील कमजोऱ्या किंवा आजारा उघडपणे कबुल करायचा असतो तेव्हा एक वेगळे धैर्य जवळ असणे आवश्यक असते. सुप्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एका ट्विटमध्ये खुलासा केला आहे की, त्यांना 'डिस्लेक्सिया'चा त्रास आहे. त्यांनी सोमवारी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, 'जीवनातील धडा मी पूर्णतः डिस्लेक्सिक आहे. शोधलं तर अनेक कलाकार, कवी, संगीतकार यांनाही डिस्लेक्सियाचा त्रास होतो. तुम्हालाही आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने ( artificial intelligence ) मला व्हिज्युअल गणिताची आवड निर्माण झाली, पण शाळेत गणिताबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता...अर्थातच! डिस्लेक्सियाच्या संख्येला काही अर्थ नसतो.'
-
Lessons of Life : I’m completely dyslexic. And finding more and more artists poets musicians suffer from dyslexia too. Are you?
— Shekhar Kapur (@shekharkapur) May 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
With #AI I’ve developed a love for visual mathematics, but in school developed a hatred for Maths…ofcourse ! With #dyslexia numbers made little sense
">Lessons of Life : I’m completely dyslexic. And finding more and more artists poets musicians suffer from dyslexia too. Are you?
— Shekhar Kapur (@shekharkapur) May 8, 2023
With #AI I’ve developed a love for visual mathematics, but in school developed a hatred for Maths…ofcourse ! With #dyslexia numbers made little senseLessons of Life : I’m completely dyslexic. And finding more and more artists poets musicians suffer from dyslexia too. Are you?
— Shekhar Kapur (@shekharkapur) May 8, 2023
With #AI I’ve developed a love for visual mathematics, but in school developed a hatred for Maths…ofcourse ! With #dyslexia numbers made little sense
शेखर कपूर यांना डिस्लेक्सिया - शेखर कपूर यांच्या या ट्विटने नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या पोस्टवर अनेकांनी आपले मत व्यक्त केलेी आहेत. 'मी डिस्लेक्सिक आहे, व्यवसायाच्या गणिताबद्दल गोडी विकसित केली आहे कारण त्याचे एक ध्येय समोर होते. पारंपारिक गणिते मला अजूनही भयानक स्वप्न देतात,' असे एकाने ट्विटरवर लिहिले. दुसर्या व्यक्तीने लिहिले, जागरूकता आणि दुर्मिळ संवेदनशीलतेसह हा विषय मांडल्याबद्दल धन्यावाद.' तर एकाने लिहिलंय की, 'शेखरजी तुम्हाला कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज नाही, त्यासाठी इतरही कात्रे तंत्रे आहेत.'
तारे जमीन पर चित्रपटाने डिस्लेक्सिया बद्दल केली होती जागृती - आमिर खान आणि दर्शील सफारी यांच्या भूमिका असलेला 'तारे जमीन पर' हा चित्रपटामुळे डिस्लेक्सिया हा आजार पहिल्यांदा मुख्य प्रवाहातील चित्रपटात दाखवला गेला आणि त्याभोवती संभाषण सुरू झाले. शेखर कपूर सोशल मीडियावर आपल्या जीवनातील अनेक पैलू, सर्जनशीलता आणि चित्रपटमाध्यम याविषयी त्यांची निरीक्षणे आणि चिंतनशील विचार मांडणारी पोस्ट लिहित असतात.
शेखर कपूर यांचा आगामी चित्रपट - शेखर कपूर यांनी अलीकडेच 'व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट' या ब्रिटिश रोमँटिक कॉमेडीचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची पटकथा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची माजी पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांनी लिहिली आहे. या चित्रपटात शबाना आझमी यांनी ब्रिटिश अभिनेत्री लिली जेम्स आणि पाकिस्तानी अभिनेता सजल अली यांच्यासोबत काम केले आहे. गेल्या वर्षी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय टोरंटो चित्रपट महोत्सवात 'व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट' चित्रपटाचा प्रीमियर झाला. या महोत्सवात चित्रपटाला दोन स्टँडिंग ओव्हेशन मिळाल्या होत्या. शबाना, लिली आणि सजल यांनी प्रीमियरला उपस्थित राहून प्रेक्षकांना आनंदित केले होते.
हेही वाचा - Jitendra Awhad On The Kerala Story: द केरळ स्टोरीच्या निर्मात्याला भर चौकात फाशी द्या - जितेंद्र आव्हाड