ETV Bharat / entertainment

Varun Tej Lavanya Tripathi : साऊथ स्टार कपल वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी हैदराबाद विमानतळावर स्पॉट - Hyderabad airport

Varun Tej Lavanya Tripathii : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील स्टार कपल वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी यांचं नुकतंच लग्न झालं. दरम्यान त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे कपल नुकतेच हैदराबाद विमानतळावर दिसले.

Varun tej and lavanya tripathi
वरुण तेज आणि लावण्य त्रिपाठी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 10:09 PM IST

मुंबई : Varun Tej Lavanya Tripathi : तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध स्टार कपल वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी अखेर विवाहबंधनात अडकले. या जोडप्यानं १ नोव्हेंबर २०२३ रोजी इटलीतील टस्कनी येथे त्यांचे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. वरुण आणि लावण्याच्या लग्नाला मेगास्टार चिरंजीवी, पवन कल्याण, राम चरण, अल्लू अर्जुन यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. वरुण आणि लावण्या यांनी आता त्यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे. या जोडप्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी विमातळावर स्पॉट : विवाह झाल्यानंतर हे नवविवाहित जोडपं हैदराबाद विमानतळावर स्पॉट झालं. त्यांचं तेथे फुलांनी स्वागत करण्यात आलं. वरुण तेजनं यावेळी निळा टी-शर्ट आणि तपकिरी बॉम्बर जॅकेट घातलं होतं. यासोबत त्यानं स्टायलिश सनग्लास लावला होता. यावर त्यानं गळ्यात चेन घातली होती. तर लावण्या नो-मेकअप लूकसह पिवळ्या सलवार सूटमध्ये दिसली. यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. या नवविवाहित जोडप्याचा पहिला फोटो २ नोव्हेंबर रोजी पोस्ट करण्यात आला होता. हा फोटो शेअर करत वरुणनं लिहलं, 'माय लव्ह'. फोटोमध्ये दोघेही एकत्र फोटोसाठी पोझ देताना दिसत होते. वरुण तेज आणि लावण्या त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगनंतर हैदराबादला परतल्यावर त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीतील मित्रांसाठी एक भव्य रिसेप्शन आयोजित करणार आहे.

राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी केला फोटो शेअर : राम चरणची पत्नी उपासना कामिनेनीनं देखील लग्नाच्या मंडपातील एक अप्रतिम आणि परफेक्ट फॅमिली फोटो शेअर केला. उपासनानं तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये लिहलं, 'वरुण आणि लावण्याचे अभिनंदन आणि आभार. सर्वात मजेदार वेळ. सर्वोत्तम आठवणी. हा अद्भुत अनुभव. लावण्या कुटुंबात आपले स्वागत आहे. आम्ही सर्व तुमच्यावर प्रेम करतो'. या फोटोमध्ये उजव्या बाजूनं अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डी पिवळ्या ड्रेसमध्ये, अल्लू अर्जुन शेजारी आहे, राम चरणची आई आणि बहीण, मेगास्टार चिरंजीवी, वरुण तेजचे स्टार वडील नागाबाबू आणि पवन कल्याण पत्नीसह, राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कामिनेनीच्या बाजूला उभा दिसत आहे. दरम्यान, काल राम चरणनं वरुण-लावण्‍याच्‍या कॉकटेल पार्टीमधला फोटो शेअर करून या जोडप्याचे अभिनंदन केलं होतं. वरुण आणि लावण्या दोघेही साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत.

हेही वाचा :

  1. kajol devgan : काजोल तिची मुलगी न्यासा आणि मुलगा युगसोबत झाली मुंबई विमानतळावर स्पॉट
  2. SRK unveils Dunki new posters : शाहरुख खान म्हणतो, भेटा राजकुमार हिराणीच्या 'उल्लुच्या पठ्ठ्यांना'
  3. Mouni Roy DELETES fangirl post : मौनी रॉयनं दुल्कर सलमानला समर्पित केलेली 'फॅनगर्ल' पोस्ट केली डिलीट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.