ETV Bharat / entertainment

उर्फी जावेद अतरंगी फॅशनमुळं झाली ट्रोल ; फोटो व्हायरल - उर्फी जावेद

Uorfi Javed : उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनमुळं पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोवर अनेकजण कमेंट करून तिला ट्रोल करत आहे.

Uorfi  Javed
उर्फी जावेद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 1:01 PM IST

मुंबई - Uorfi Javed : बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनमुळं नेहमीच चर्चेत असते. उर्फीनं पुन्हा एकदा अतरंगी ड्रेस परिधान करून लोकांना आश्चर्यचकित केले आहे. यावेळी उर्फीनं असा पेहराव केला की, अनेकजण तिला आता सोशल मीडियावर ट्रोल करत आहे. सध्या उर्फीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये तिनं निळ्या रंगाच्या मिडीसह वेगवेगळ्या रंगाचं स्टोन असलेलं क्रॉप टॉप घातलं आहे. तिचा लूक हा खूप वेगळा दिसत आहे. यावर तिनं न्यूड मेकअप केला आहे. याशिवाय तिनं केस हे बनमध्ये बांधले आहेत.

उर्फी जावेद झाली ट्रोल : उर्फीच्या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, ''छपरी गर्ल''. दुसऱ्या एकानं लिहिलं, ''ती अर्ध्या कपड्यात कुठेही जाते, त्यामुळं ही मोठी गोष्ट नाही''. आणखी एकानं लिहिलं, ''ती काय घालते ते माहित नाही , तिचं तिला देखील कळत नाही''. अशा अनेक कमेंट तिच्या फोटोवर येत आहेत. याशिवाय काहीजण तिला तिचे कौतुक करताना दिसत आहे. एका यूजरनं तिचं कौतुक करत म्हटलं, ''खूप खास फोटो आहे''. दुसऱ्या एकानं लिहिलं, ''या ड्रेसमध्ये ती खूप खास दिसत आहे, असेच फोटो पोस्ट करत राहा''. आणखी एकानं पोस्टवर कमेंट करत लिहिलं, ''उर्फी तू खूप सुंदर दिसतेस.'' काहीजणांनी तिच्या फोटोच्या पोस्टमध्ये हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केले आहेत.

उर्फी जावेदचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल : उर्फी जावेदला तिच्या अतरंगी फॅशनमुळं अनेकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहेत. याआधी पोलीस स्टेशनमध्ये विचित्र कपडे परिधान केल्यामुळं ती चर्चेत आली होती. यानंतर तिचे प्रचंड फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं, मात्र उर्फी कधीच कोणाच्या कमेंटकडे लक्ष देत नाही. हाच वागण्याबोलण्यातला अतरंगीपणा आणि बेडर स्वभाव ही उर्फी जावेदची ओळख बनला आहे. काहींना तिची स्टाइल आणि कपडे घालण्याची पद्धत 'कूल' वाटते, तर अनेकजण तिच्या स्टाइलला नाक मुरडतात.

हेही वाचा :

  1. WATCH : अमेरिका में बजा 'एनिमल' के डायरेक्टर का डंका, फैंस ने घेर लगाए संदीप रेड्डी वांगा के नाम के जयकारे
  2. 'एनिमल' के सामने डटकर खड़ी है विक्की कौशल की सैम बहादुर, जानें 9 दिनों में कहां पहुंचा कलेक्शन
  3. ऑस्कर्स की रेस में हिना खान की 'कंट्री ऑफ ब्लाइंड', एक्ट्रेस बोलीं- जीत से बस एक कदम दूर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.