मुंबई - छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळाल्यावर अनेक कलाकार मोठ्या पडद्यावर अवतरत असतात. किंबहुना अनेक निर्माते दिग्दर्शक अश्या कलाकारांच्या छोट्या पडद्यावरील 'पॉप्युलर'पणाचा फायदा उचलताना दिसतात. परंतु महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांना चांगली कलाकृती बघायला मिळण्याची शक्यता वाढते. टेलिव्हिजन वरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतून अभिनेत्री दिव्या पुगांवकर प्रसिद्ध झाली. ती आता मोठ्या पडद्यावर आपले अभिनय गुण दर्शविण्यासाठी सज्ज झाली आहे. आगामी मराठी चित्रपट 'विठ्ठल माझा सोबती' मधून ती चित्रपट पदार्पण करीत असून या चित्रपटाच्या माध्यमातून विठुरायाची वारी न अनुभवता येणाऱ्या सिनेरसिकांना वारीचा आनंद उपभोगता येणार आहे. विठूरायाचे दर्शन आणि वारी या दोन्हींचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे.
![अभिनेत्री दिव्या पुगांवकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-06-2023/mh-mum-ent-divya-pugaonkar-vitthal-maza-sobti-mhc10001_17062023195232_1706f_1687011752_766.jpg)
दिव्याला मिळाली 'विठूराया' ची साथ' म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगांवकर ही आता 'विठ्ठल माझा सोबती' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लहान पडद्यावरील 'मुलगी झाली हो' या मालिकेतील ‘माऊ’ सध्या विठूरायाच्या आराधनेत रमलेली दिसून येत आहे. विठ्ठलावर निस्सीम श्रद्धा असलेल्या एका सोज्वळ मुलीच्या भूमिकेत दिव्या दिसणार असून हा चित्रपट प्रत्येक विठ्ठल भक्तांसाठी आनंदवारी असेल.
आपल्या या भूमिकेविषयी दिव्या पुगांवकर म्हणाली की, "संकटात असताना भक्ती मार्गाचा अवलंब केला तर देव तुमची नक्कीच मदत करतो असे या चित्रपटातून सूचित करण्यात आले आहे. माझी व्यक्तिरेखा विठ्ठल भक्त असून तो तिची कशी पाठराखण करतो हे चित्रपटातून दिसेल. या चित्रपटामुळे मला अत्यंत गुणी आणि सहृदय लोकांसोबत जुळण्याचा मौका मिळाला याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते. उत्तम दिग्दर्शक, अप्रतिम सहकलाकार आणि प्रथितयश निर्मितीसंस्था मला मिळाले याबद्दल मी ऋणी आहे. 'विठ्ठल माझा सोबती' हा चित्रपट प्रेक्षकांना एक अप्रतिम अनुभव देईल याची ग्वाही मी देते."
![अभिनेत्री दिव्या पुगांवकर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17-06-2023/mh-mum-ent-divya-pugaonkar-vitthal-maza-sobti-mhc10001_17062023195232_1706f_1687011752_392.jpg)
या चित्रपटात दिव्या पुगांवकरसह अरुण नलावडे, संदीप पाठक, राजेंद्र शिसतकर, आशय कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी, अभय राणे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'विठ्ठल माझा सोबती' ची निर्मिती फक्त मराठी आणि नाईंटी नाईन प्रोडक्शन यांनी केली असून याचे दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे. आषाढी एकादशीचं औचित्य साधून येत्या २३ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा -
१. Adipurush Screening : आदिपुरुष स्क्रीनिंगला इब्राहिम अली खानने नेटिझन्सचे घेतले लक्ष वेधून
२. War 2 Movie : वॉर 2मध्ये हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर बरोबर झळकणार कियारा अडवाणी
३.Lust Story 2 Promo : 'लस्ट स्टोरीज 2'चा नवीन प्रोमो प्रदर्शित