ETV Bharat / entertainment

Tiku Weds Sheru kissing controversy: नवाजुद्दीनने अवनीत कौरसोबतच्या चुंबन दृष्याचे केले समर्थन - टिकू वेड्स शेरूचे नवे गाणे तुम से मिलके रिलीज

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने सहकलाकार अवनीत कौरसोबत त्याची असलेली जोडी आणि या चित्रपटातील चुंबन दृष्याचे समर्थन केले. या चित्रपटातील चुंबन दृष्यावरुन त्याच्यावर काही लोक टीका करत आहेत.

Tiku Weds Sheru kissing controversy
नवाजुद्दीनने अवनीत कौरसोबतच्या चुंबन दृष्याचे केले समर्थन
author img

By

Published : Jun 20, 2023, 11:54 AM IST

मुंबई - आगामी ओटीटी चित्रपट टिकू वेड्स शेरूच्या ट्रेलरमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या लिप लॉकने सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटली आहे. ४९ वर्षांचा नवाजुद्दीन सिद्दीकी २१ वर्षाच्या अवनीत कौरचे चुंबन घेतो हे दृष्य बऱ्याच लोकांना पचवणे कठीण जात आहे. याबाबत नवाजने आपली प्रतिक्रिया देऊन या चुंबन दृष्याबद्दल भाष्य केले आहे.

नवाजुद्दीन म्हणतो, प्रणयाला वयाची मर्यादा नसते - नुकतेच एका मुलाखतीत नवाजुद्दीनने अवनीतसोबतच्या त्याच्या जोडीचे समर्थन केले आणि म्हणाला की, त्यात कोणती अडचण आहे? तो म्हणाला की प्रणयाला वयाची मर्यादा नसते आणि तरुणांनी रोमान्स केला नाही तर मग त्यात काय उरले. नवाज पुढे म्हणाले की अनंत काळापासून लोक प्रेमात पडतात आणि खूप काळ एकत्र राहतात.

रोमँटिक माणसेच रोमान्स करु शकतात - त्यानंतर त्याने एक उदाहरण दिले की सुपरस्टार शाहरुख खान कसा रोमँटिक भूमिका घेतो कारण नवाजच्या मते तरुण पिढी 'नल्ली' (निरुपयोगी) आहे आणि त्यांना रोमान्स माहित नाही. आता प्रेम आणि ब्रेकअप यासह सर्व काही व्हॉट्सअपवर घडते, असे तो पुढे म्हणाला. 'रोमान्स अनुभवलेली माणसं रोमान्स करू शकतात. बाकी कोण करणार?', असेही तो पुढे म्हणाला.

टिकू वेड्स शेरूचे नवे गाणे तुम से मिलके रिलीज - दरम्यान, टिकू वेड्स शेरूचे नवे गाणे तुम से मिलके नुकतेच रिलीज झाले आहे. मोहित चौहानने गायलेल्या, या गाण्यात नवाजुद्दीन आणि अवनीत कौर आहेत. या गाण्यामध्ये रोमँटिक सेटिंगमध्ये त्यांची केमिस्ट्री दाखवताना दिसत आहेत. तुम से मिलके हे गाणे गौरव चॅटर्जी आणि साई कबीर यांनी संगीतबद्ध केले आहे आणि ते साई कबीर यांनी लिहिले आहे. साई कबीर श्रीवास्तव दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली कंगना रणौत करत आहे. हा चित्रपट 23 जूनपर्यंत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर प्रीमियर होणार आहे.

हेही वाचा -

१. Kartik Aaryan admits :आपल्यावर मुले आणि मुलीही लाईन मारतात, कार्तिक आर्यनची कपिल शर्मा शोमध्ये कबुली

२. Controvesy On Adipurush: आदिपुरुषचा वाद चिघळला; आदिपुरुष चित्रपटावर बंदी आणा, साधू महंतांची मागणी

३. Bigg Boss OTT 2: मनीषा राणीने जदीन हदीदचे चुंबन घेत दिले संभाव्य प्रेमकथेचे संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.