मुंबई - सलमान खानच्या निर्मात्यांनी त्याच्या 'टायगर 3' मधील धमाकेदार एन्ट्रीसाठी सज्ज राहण्याचा सल्ला प्रेक्षकांना दिलाय. यशराजच्या स्पाय युन्हर्समधील तिसऱ्या भागात केवळ अॅक्शनच नाही तर मनाला आनंद आणि नेत्रसुखद अनुभवही मिळणार आहे. या चित्रपटात 10 मिनीटांचा थरारक अॅक्शन सीक्वेन्स आहे जो प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवणारा आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दिग्दर्शक मनीष शर्मानं 'टायगर 3' मधील सलमान खानच्या एन्ट्रीचं सुंदर डिझाईन केल्याबद्दल आनंद व्यक्त केलाय. सलमानचा कायम लक्षात राहील अशा प्रकारची एन्ट्री घेण्याचा इतिहास आहे आणि 'टायगर 3' च्या क्रिएटीव्ह टीमनं याचा दर्जा आणखी उंचावण्याचा निर्धार केलाय. शर्मा यांनी शेअर केलंय, ''सलमान खाननं आम्हाला असंख्य संस्मरणीय एन्ट्री दिल्या आहेत, सलमानचे चाहते आणि हिंदी चित्रपट प्रेमी ज्या प्रतिष्ठित क्षणांची वाट पाहत आहेत त्यापैकी हा एक आहे.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'टायगर' फ्रँचायझीमध्ये सलमान खानची प्रत्येक एन्ट्री लक्ष वेधणारी आहे, इथे त्याची अनोखी स्टाईल पुन्हा एकदा खास बनवण्याचा आव्हान होतं. चित्रपटाच्या क्रिएटीव्ह टीमसह अॅक्शन एक्सपर्ट, स्टंट परफॉर्मर्स आणि स्पेशल इफेक्ट्स तज्ञ यांनी सलमानच्या एन्ट्रीला 10 मिनीटांची अॅक्शन सीक्वेन्स तयार करण्यासाठी सहकार्य केलं. शर्मा यांनी जोर देत सांगितलं की, ''हा इंट्रो सीक्वेन्स चित्रपटाचा एक खास आकर्षण असणार आहे आणि यात एक रोमांचक अॅक्शन सीक्वेन्सचा समावेश आहे जो भाईच्या चाहत्यांना टायगर किती जबरदस्त आहे याची आठवण करून देईल."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'टायगर 3' साठी केलेले हे श्रम खूप महत्त्वाचे आहेत कारण सलमान खानला पुन्हा एकदा पडद्यावर टायगरच्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झालेत. त्यामुळे त्याची एन्ट्री शिट्टीमार झालीच पाहिजे याची काळजी निर्मात्यांनी घेतल्याचं दिसतंय. दिग्दर्शक मनीष शर्मानं भूतकाळातील अनुभवांची आठवण करुन देताना सांगितलं की, "मला आठवतंय जेव्हा सलमान खान पडद्यावर आला तेव्हा प्रेक्षकांनी किती गर्जना केली होती आणि टाळ्या शिट्ट्यांनी थिएटर दणाणून सोडलं होतं. 'टायगर 3' च्या रविवारी होणाऱ्या रिलीजच्या वेळी तसंच सेलेब्रिशन प्रेक्षकांसोबत साजरं करण्यासाठी मी आतुर झालोय."
'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वॉर' आणि 'पठाण'च्या यशानंतर यशराज फिल्म्सच्या YRF स्पाय युनिव्हर्समधील 'टायगर 3' हा पाचवा चित्रपट आहे. हा चित्रपट रविवारी १२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सलमान खानच्या चाहत्यांसाठी हा दिवस कोणत्याही सणाहून कमी नाही.
हेही वाचा -
3. Janhvi Kapoor And Shikhar Pahariya : जान्हवी कपूरला शिखर पहारियानं म्हटलं, 'मी पूर्णपणे तुझा आहे'