मुंबई - Tiger 3 advance booking : सलमान खानच्या बहुप्रतीक्षित 'टायगर 3' चित्रपटाची प्रतीक्षा चाहत्यांकडून सुरू आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 12 नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या या चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला एक आठवडा आधीच सुरुवात होणार आहे. 5 नोव्हेंबरला आगाऊ बुकिंगला सुरुवात होईल. यावर्षी 'पठाण', 'जवान' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर सलमानच्या या चित्रपटाकडून निर्मात्यांच्या भरपूर अपेक्षा आहेत. त्यानुसार बॉक्स ऑफिसवर कशी जबरदस्त सुरुवात होईल याकडे त्यांनी लक्ष केंद्रीत केलंय. टायगर 3 च्या आगाऊ बुकिंग तिकीट विकीला सुरुवात होणार असल्यामुळे सलमान खानच्या चाहत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
-
#Xclusiv… SALMAN KHAN - ‘TIGER 3’…#Tiger3 run time: approx. 2.35 hours… Advance bookings commence on [Sunday] 5 Nov 2023… Exactly *one week* before its theatrical release [Sunday; 12 Nov 2023].#SalmanKhan #KatrinaKaif #EmraanHashmi #ManeeshSharma #AdityaChopra #YRF #Diwali… pic.twitter.com/9AwicR7t7z
— taran adarsh (@taran_adarsh) October 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Xclusiv… SALMAN KHAN - ‘TIGER 3’…#Tiger3 run time: approx. 2.35 hours… Advance bookings commence on [Sunday] 5 Nov 2023… Exactly *one week* before its theatrical release [Sunday; 12 Nov 2023].#SalmanKhan #KatrinaKaif #EmraanHashmi #ManeeshSharma #AdityaChopra #YRF #Diwali… pic.twitter.com/9AwicR7t7z
— taran adarsh (@taran_adarsh) October 26, 2023#Xclusiv… SALMAN KHAN - ‘TIGER 3’…#Tiger3 run time: approx. 2.35 hours… Advance bookings commence on [Sunday] 5 Nov 2023… Exactly *one week* before its theatrical release [Sunday; 12 Nov 2023].#SalmanKhan #KatrinaKaif #EmraanHashmi #ManeeshSharma #AdityaChopra #YRF #Diwali… pic.twitter.com/9AwicR7t7z
— taran adarsh (@taran_adarsh) October 26, 2023
दरम्यान 'टायगर 3' चित्रपटाची लांबी 2 तास 35 मिनीटांची असल्याचं आणि चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगला 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असल्याचं, ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे.
'टायगर जिंदा है', 'वॉर' आणि 'पठाण'च्या नंतर यशराज फिल्म्सच्या गुप्तहेर विश्वातील 'टायगर 3' हा महत्त्वकांक्षी चित्रपट आहे. देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावलेल्या भारतीय गुप्तहेराच्या या कथेत या भागात टायगरच्या खासगी आयुष्यावर शत्रूकडून आक्रमण होणार आहे. यासाठी तो पुन्हा एकदा निकराची झुंज देताना मोठ्या पडद्यावर अनेक चमत्कार घडवताना दिसेल. या चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त होता आणि प्रेक्षकांनी त्याचं मनापासून स्वागत केलंय. चित्रपटातील 'लेके प्रभू का नाम' हे पहिलं गाणंही प्रेक्षकांना आवडलंय. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ यांची ऑन स्क्रिन केमेस्ट्रीही जबरदस्त दिसतेय. शिवाय इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत फिट बसलाय. चित्रपट रिलीजनंतर आणखीही अनेक चकित करणाऱ्या गोष्टी चित्रपटात सरप्राईज असणार आहेत. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढली आहे.
'टायगर 3' बद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाचं दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केलंय आणि निर्माता आदित्य चोप्रानं यशराज फिल्म्स अंतर्गत याची निर्मिती केली आहे. यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट आहे. 'एक था टायगर', 'टायगर जिंदी है', 'वॉर', 'पठाण' आणि आता 'टायगर 3' हा चित्रपट येतोय. या चित्रपटात कतरिना कैफ आक्रमक अवतारात टायगरची साथ देताना दिसणार आहे. यंदाचं वर्ष यशराज फिल्म्सच्या चित्रपटांसाठी खूपच फलदायी ठरु शकतं. 'पठाण' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईचे आकडे 'टायगर 3' पार करु शकतो असा विश्वास निर्मात्यांच्या प्रमोशन प्लॅनवरुन दिसत आहे.
हेही वाचा -
1. Mami Film Festival 2023 : देसी गर्ल प्रियांका चोप्राचं मामी फेस्टीव्हलसाठी आगमन
3. Kangana Ranaut : कंगना राणौतनं 'तेजस' रिलीजपूर्वी घेतलं रामलल्लाचं दर्शन