मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी गेल्या महिन्यात लग्नबंधनात अडकले होते. एका पुरस्कार सोहळ्यातील मिशन मजनू स्टार सिद्धार्थचा व्हिडिओ ऑनलाइन समोर आल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, सिद्धार्थ फेब्रुवारीमध्ये कियारासोबत लग्न केल्यानंतरचा दुसरा पुरस्कार जिंकल्यानंतर भाषण करताना दिसत आहे. हा पुरस्कार त्याने आपली पत्नी कियाराला समर्पित करुन तिच्यावरील आपले प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केल्याने कियाराला भुरळ पडली आहे.
शुक्रवारी रात्री सिद्धार्थला त्याच्या स्टाईल गेमसाठी पुरस्कार मिळाला. अभिनेता सिद्धार्थ सध्या इंटरनेटवर यामुळे खूप चर्चेतआहे. त्याचा रेड कार्पेट लूकच्या व्यतिरिक्त त्याने कियारावरील प्रेम अनोख्या पद्धतीने दाखवल्याने या जोडप्याच्या चाहत्यांना आनंदाच्या उकळ्या फुट आहेत.
-
My Wife Will Be So Happy 😩🤌🥹🧿
— VD 🤝😻🥳 (@Deepti_Vishwas) March 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Husband Malhotra Is Love 🥹🧿❤️😭@advani_kiara you got lucky 🧿❤️😭#SidKiara #SidharthMalhotra #KiaraAdvani pic.twitter.com/ByLn1diDY0
">My Wife Will Be So Happy 😩🤌🥹🧿
— VD 🤝😻🥳 (@Deepti_Vishwas) March 25, 2023
Husband Malhotra Is Love 🥹🧿❤️😭@advani_kiara you got lucky 🧿❤️😭#SidKiara #SidharthMalhotra #KiaraAdvani pic.twitter.com/ByLn1diDY0My Wife Will Be So Happy 😩🤌🥹🧿
— VD 🤝😻🥳 (@Deepti_Vishwas) March 25, 2023
Husband Malhotra Is Love 🥹🧿❤️😭@advani_kiara you got lucky 🧿❤️😭#SidKiara #SidharthMalhotra #KiaraAdvani pic.twitter.com/ByLn1diDY0
शनिवारी, कियाराने इंस्टाग्राम स्टोरीजवर सिद्धार्थचा व्हायरल व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तो आपल्या पत्नीबद्दल गप्पा मारताना दिसत आहे. आपल्या नावाने पुरस्कार समर्पित केल्यानंतर भारावलेल्या कियाराने इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले, 'या माणसाकडे माझे संपूर्ण हृदय आहे,' असे तिने लाल हृदय इमोजीसह लिहिले आहे.
कियाराला हा पुरस्कार समर्पित करताना सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला, 'माझ्या लग्नानंतरचा हा माझा दुसरा पुरस्कार आहे. पहिला पुरस्कार अभिनयासाठी होता, तर हा स्टाईलसाठी आहे. त्यामुळे मला वाटते की माझी पत्नी आनंदी होईल. ती एक चांगली अभिनेत्री आहे जी अत्यंत स्टायलिश आहे. हा पुरस्कार तिच्याकडे जातो.' शेरशाह अभिनेत्याने त्याच्या ग्लॅम टीमचे आणि डिझाइनर्सचे आभार मानले ज्यांनी त्याला त्याच्या स्टाईलसाठी मदत केली.
सिद्धार्थ आणि कियारा अडवानी यांनी राजस्थानमध्ये अत्यंत मोजक्या मित्र आणि नातेवाईकांच्या हजेरीत लग्नगाठ बांधली होती. शेरशाह चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर व पडद्यावर रोमान्स केल्यानंतर हे जोडपे ऑफ स्क्रिनही रोमान्स करत होते. अखेरपर्यंत त्यांनी याचा सुगावा मीडियाला लागू दिला नव्हता. अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली आणि विवाहाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिले. त्यानंतर दिल्लीत नातेवाईकांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. मुंबईतही आपल्या बॉलिवूड बंधू भगिनींसाठी त्याने खास रिसेप्शनचे आयोजन केले होते.
हेही वाचा - शाहिद कपूर आणि विजय सेतुपती स्टारर 'फर्जी' ठरली सर्वाधिक पाहिली गेलेली वेब सिरीज