चेन्नई (तामिळनाडू) - Rajni Tribute to Vijkanth : मेगास्टार रजनीकांत यांनी शुक्रवारी डीएमडीके प्रमुख आणि अभिनेता विजयकांत यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण केली. इंटरनेटवर झळकलेल्या व्हिडिओंमध्ये, रजनीकांत विजयकांत यांच्या पत्नी प्रेमलता विजयकांत यांचे आयलँड ग्राउंड, अण्णा सलाई येथे सांत्वन करताना दिसत आहेत. या ठिकाणी दिवंगत अभिनेता आणि राजकारणी विजयकांत यांचे पार्थिव ठेवण्यात आले आहे.
रजनीकांत यांनीही माध्यमांशी थोडक्यात संवाद साधताना विजयकांत यांच्या आठवणी जागवल्या. ते म्हणाले, "विजयकांतसारखी चांगली व्यक्ती आम्हाला कधीच मिळणार नाही. राजकारण आणि चित्रपटसृष्टीत त्यांच्यासारखा कोणीच व्यक्ती नाही. हे नुकसान कधीही भरून न येणारे आहे. विजयकांत (७१) यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने आणि न्यूमोनियाशी झुंज देत चेन्नईत निधन झाले. कोविड-19 ची त्यांची टेस्टही पॉझिटिव्ह आली होती. डीएमडीके प्रमुखांचे पार्थिव आधी डीएमडीके कार्यालयात ठेवण्यात आले होते, जिथे अनेक राजकीय नेता, अभिनता आणि इतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते. याआधी, नोव्हेंबरमध्ये विजयकांत यांना एमआयओटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चेन्नईत त्यांची प्रकृती खालावली. खोकला आणि घसादुखीचा त्रास होत असल्याने ते १४ दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. विजयकांतच्या निधनानंतर संपूर्ण तमिळ सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.
'कॅप्टन' म्हणून सर्वत्र ओळखले जाणारे, विजयकांत यांचे जीवन तमिळ चित्रपट उद्योगातील यशस्वी कारकीर्दीमुळे सर्वश्रुत आहे. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी 154 चित्रपटांमध्ये काम केले. नादिगर संगम (अधिकृतपणे दक्षिण भारतीय कलाकार संघटना (SIAA) म्हणून ओळखले जाते) येथे पदावर असताना, विजयकांत यांनी दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगात क्रांतिकारक बदल घडवून आणले. त्यांनी विरुधाचलम आणि ऋषिवंदियम मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत दोन वेळा विधानसभेचे सदस्य म्हणूनही काम केले होते.
हेही वाचा -
2. अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली मजेशीर पोस्ट