ETV Bharat / entertainment

Ekdam Kadak Movie : 'एकदम कडक'च्या ट्रेलरची सोशल मिडियावर होत आहे चर्चा! - Bhagyashree Mote

'प्रेम द्यायचं असतं, प्रेम घ्यायचं असतं ते 'प्रेम बीम काय नाय बरं का' या स्टेज ला प्रेम पोहोचते तेव्हा त्याची महती कळते. प्रेम करणे हे येऱ्या गबाळ्याचं काम नव्हे हे एकदम कडक (Ekdam Kadak Movie) या चित्रपटातून गमतीशीर पद्धतीने मांडण्यात आले आहे. त्यासाठी चित्रपटात कलाकारांनी घातलेला धुडगूस पाहणो रंजक ठरणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

Ekdam Kadak Movi
एकदम कडक
author img

By

Published : Nov 15, 2022, 12:59 PM IST

मुंबई: 'एकदम कडक' (Ekdam Kadak Movie) चित्रपटाच्या टिझरने रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते आणि आता चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. एकदम कडक म्हणत तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या लक्षणीय अभिनेत्रींना तरुण कलाकारांचा घोळका तोडीस तोड देत आहे हे ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसले.

एकदम कडक चित्रपट कास्ट: 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत एकदम कडक चित्रपटातून अभिनेते माधव अभ्यंकर (Madhav Abhyankar), शशांक शेंडे (Shashank Shende), पार्थ भालेराव (Parth Bhalerao), तानाजी गलगुंडे (Tanaji Galgunde), अरबाज (Arbaaz), चिन्मय संत (Chinmay Sant) तसेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार (Rukmini Sutar), भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote), गायत्री जाधव, प्रांजली कंझारकर, जयश्री सोनुने रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहेत.

महाराष्ट्रातील तमाम चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार: 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा गणेश शिंदे यांनी पेलवली आहे. तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप याचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू स्व. नरेंद्र भिडे, पंकज पडघन, उमेश गवळी यांनी दिले आहे. तर गीतकार म्हणून मंगेश कांगणे आणि गणेश शिंदे यांनी बाजू सांभाळली आहे. तर चित्रपटातील इतर गाणी सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, उमेश गवळी, सौरभ साळुंखे, सायली पंकज यांनी सुरबद्ध केली आहेत. हा चित्रपट छायाचित्रकार बाबा लाड यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला असून चित्रपटाच्या संकलनाची बाजू आनंद कामत, संदीप जंगम आणि ओम साई फिल्म स्टुडिओ यांनी उत्तमरित्या निभावली आहे. येत्या २ डिसेंबरला 'एकदम कडक' महाराष्ट्रातील तमाम चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.