ETV Bharat / entertainment

Palyad Movie : स्मशानयोगी समाजातील एका कुटुंबाची गोष्ट 'पल्याड' चित्रपटातून, देविका दफ्तारदार महत्वपूर्ण भूमिकेत

author img

By

Published : Nov 13, 2022, 5:33 PM IST

सकस अभिनयासाठी देविका दफ्तारदार (Devika Daftardar) ओळखल्या जाते आणि तिच्याकडे नेहमीच सशक्त भूमिका येतात. तिची महत्वपूर्ण भूमिका असलेला 'पल्याड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला समीक्षकांकडून स्तुतीपर परीक्षणे मिळाली आहेत.

Palyad Movie
पल्याड चित्रपट

मुंबई: मराठी रंगभूमीवर मालिका आणि चित्रपटात अनेक कलाकार येत असतात. नाटकांमुळे अभिनयाचा पाया घट्ट झालेला असतो आणि त्यामुळे तांत्रिक गोष्टी वगळता ते कलाकार 'तयार' आर्टिस्ट्स असतात आणि दिग्दर्शकांना त्याचा फायदा होत असतो. अशीच एक अभिनेत्री जिने रंगभूमीवर नाटक करत अभिनयाची पारितोषिके मिळविली ती म्हणजे देविका दफ्तारदार. सकस अभिनयासाठी ती जाणली जाते आणि तिच्याकडे नेहमीच सशक्त भूमिका येतात. तिची महत्वपूर्ण भूमिका असलेला 'पल्याड' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला समीक्षकांकडून स्तुतीपर परीक्षणे मिळाली आहेत.

चित्रपटांच्या प्रदर्शनाची गणिते कोसळली: अभिनेत्री तिच्या अनुभवबद्दल बोलताना म्हणाली, खरे म्हणजे लॉकडाऊनमुळे सगळंच ठप्प झालं होतं. कलाकार नक्कीच हवालदिल झाले होते परंतु रोजंदारीवर काम करणारे मनोरंजनसृष्टीतील कामगारांना त्याचा अधिक फटका बसला. लॉकडाऊनच्या अगोदर चित्रपटसृष्टीची तुफान घोडदौड सुरु होती. प्रत्येक शुक्रवारी तीन- तीन चार-चार चित्रपट प्रदर्शित होत होते. परंतु कोरोनाच्या आघाताने अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाची गणिते कोसळली. गेल्या दोन वर्षांत तयार चित्रपटांची संख्या वाढतच गेली आणि आता ते सर्व प्रदर्शनासाठी रांगेत आहेत. माझा 'पल्याड' सुद्धा तयार होता परंतु तो आता प्रदर्शित झाला आहे. वस्तुतः माझेच तीन-चार चित्रपट तयार आहेत आणि प्रदर्शनाची वाट बघत आहे. आपण जरी गोष्टी नॉर्मल झाल्या असे म्हणत असलो तरी पूर्वीची स्थिती यायला अजून बराच अवधी लागेल असे मला वाटते.

स्मशानयोगी समाजातील एका कुटुंबाची गोष्ट: पल्याड चित्रपटात मी एका 8-9 वर्षाच्या मुलाच्या आईची भूमिका साकारली. हा चित्रपट स्मशानयोगी समाजातील एका कुटुंबाची गोष्ट सांगतो. पिढ्यानपिढ्या ते कुटुंब गावातील मृत व्यक्तींना मोक्ष देण्याचे काम करीत असते. परंतु त्यातील आईला आपल्या मुलाने खूप शिकावे, डॉक्टर व्हावे आणि समाजाची सेवा करावी असे वाटत असते. तिच्या मुलालाही शिक्षणाची आवड असते. परंतु बापाविना असलेल्या त्या लेकराला त्याचा आजोबा शिक्षण घेऊ देत नाही. त्यातच गावातील सरपंचासकट सर्वजण त्या मुलाच्या शिक्षणाविरोधात असतात. तरीही आई आपल्या मुलाला कसा पाठिंबा देत राहते आणि आपल्यावर गावकऱ्यांचा रोष ओढवून घेते आणि खंबीरपणे त्या विरोधाचा मुकाबला करते. मला हा रोल खूप भावला. कुठलीही आई आपल्या लेकराच्या स्वप्नपूर्तीसाठी काहीही करायला तयार असते तशीच ही आई आहे. मसाणजोगी समाजात घडणाऱ्या गोष्टींवर हा चित्रपट प्रकाशझोत टाकतो. म्यूत्युनंतर मुक्ती देण्याची प्रथा, परंपरा आणि मुलाचे भविष्य या तिची झालेली दोलायमान स्थिती अशी कॉम्प्लेक्स भूमिका माझ्या वाटेला आली हे माझे सौभाग्य.

मसणजोगी समाजातील लोकांना सोसावे लागणारे हाल: चित्रपटाचा विषय कठीण आणि गांभीर्यपूर्ण आहे. यात मसणजोगी समाजातील लोकांना सोसावे लागणारे हाल वास्तविक स्वरूपात मांडण्यात आले आहेत. दिग्दर्शकाने संहिता उत्तम लिहिली असून त्याचा अभ्यासही दांडगा आहे. शूटच्या पहिल्या दिवशी मी उभी राहिल्यावर तो म्हणाला की केसात थोडी माती टाक कारण शाम्पूने धुतलेले केस दिसायला नकोत. आम्ही सर्व महिनाभर आधी चंद्रपूर मधील शिंदेवाही खेड्यात जाऊन राहिलो. ताडोबाच्या जंगल परिसरातील ते एक गाव आहे. मला त्या भागातील भाषेचा लहेजा आत्मसात करावा लागला. रुचीत निनावे (Ruchit Ninave) जो मुलाचा रोल करतोय तो त्याच भागातील आहे त्यामुळे त्याचाही फायदा झाला. तसेच शशांक शेंडेंसारखा (Shashank Shende) मातब्बर अभिनेता माझ्या सासऱ्यांची भूमिका करतोय. आम्ही आधी एकत्र काम केल्यामुळे काम करायला वेगळीच मजा आली.

देविका दफ्तारदार ‘नाळ’ च्या सिक्वेल मधेही दिसणार: खरे म्हणजे मला वेगवेगळ्या, निरनिराळ्या व्यक्तिरेखा साकारायला आवडतात. मी ग्रामीण तसेच शहरी स्त्री साकारली आहे. त्यामुळे माझे प्राधान्य चांगल्या भूमिकांना असते. परंतु नाळ नंतर माझ्या वाट्याला जास्त करून ग्रामीण भूमिका जास्त येताहेत. परंतु मला शहरी भूमिका करताना काहीच अडचण येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. मी भूमिका निवडताना अर्थातच माझी भूमिका कशी आहे ते बघते, त्यानंतर दिग्दर्शक कोण आहे याला महत्व देते. तसेच सहकलाकार कोण कोण आहेत हे बघते. माझ्या मते चांगली गोष्ट आणि चांगली भूमिका असेल तर प्रॉडक्ट चांगले बनते. देविका दफ्तारदार ‘नाळ’ च्या सिक्वेल मधेही दिसणार असून नागराज मंजुळे आणि सुधाकर रेड्डी यांचा हा प्रोजेक्ट सुरु होण्यासाठी आतुर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.