ETV Bharat / entertainment

अमिताभ, अनुपम आणि बोमन इराणीच्या 'उंचाई' चित्रपटाची रिलीज तारीख ठरली

author img

By

Published : Jul 25, 2022, 11:49 AM IST

निर्माता सूरज बडजात्या यांनी आपल्या आगामी 'उंचाई' चित्रपटाच्या रिलीजची घोषणा केली आहे. अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मिताभ, अनुपम आणि बोमन इराणी
मिताभ, अनुपम आणि बोमन इराणी

मुंबई - बॉलिवूडमधील यशस्वी निर्माता सूरज बडजात्या यांनी आपल्या आगामी 'उंचाई' चित्रपटाच्या रिलीजची घोषणा केली आहे. मल्टीस्टारर असलेला हा चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलंय, "सूरज बडजात्या यांनी उंचाई चित्रपटाच्या रिलीजची तारीख निश्चित केली आहे. उंचाई चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, नीना गुप्ता, सारिका, परिणीती चोप्रा, नफिसा अली सोधी आणि डॅनी डँग्झोपा यांच्या भूमिका असतील. हा चित्रपट ११ नोव्हेंबर रोजी रिलीज होईल."

हेही वाचा - टायगर श्रॉफचा थ्रिलर 'स्क्रू ढिला'चा धमाकेदार टिझर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.