ETV Bharat / entertainment

Galaxy owner got angry with Akshay Kumar : कपिल शर्मा शोमध्ये सतत जाणे शोभते का? गॅलक्सीच्या मालकान अक्षय कुमारला झापले - गॅलक्सीचे मालक मनोज देसाई

कपिल शर्मा शोमध्ये वारंवार जात असल्यामुळे मुंबईतील गॅलक्सी चित्रपटगृहाचे मालक मनोज देसाई यांनी अक्षय कुमारला चांगलेच झापले आहे. त्याचा सेल्फी चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

कपिल शर्मा शोमध्ये अक्षय कुमार
कपिल शर्मा शोमध्ये अक्षय कुमार
author img

By

Published : Mar 2, 2023, 3:00 PM IST

मुंबई - अक्षय कुमारचा सेल्फी चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला आहे. त्यामुळे त्याचा हा सलग पाचवा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. यामुळे अनेकांनी अक्षयलाच जबाबदार धरले आहे. मुंबईतील गॅलक्सी चित्रपटगृहाचे मालक मनोज देसाई यांनी अक्षय कुमारला चांगलेच झापले आहे.

गॅलक्सीचे मालक मनोज देसाई यांनी अक्षय कुमारला वारंवार कपिल शर्मा शोमध्ये उपस्थित राहात असल्यामुळे झापले आहे. मनोज देसाई म्हणाले, 'माझ्या अनेक मित्रांनी आणि प्रेक्षकांनी म्हटलंय की हा अक्षय कुमार वारंवार कपिल शर्मा शोमध्ये जातो, त्याला हे शोभून दिसतं का? मी हा प्रश्न तुम्हाला विचारतो, तुम्हाला हे शोभून दिसत का? कपिलने मला तीन वेळा बोलवलं, मी एकदाही गेलो नाही. कारण तो कधी तुमचे कौतुक करतो तर कधी तुमचा कचरा करतो. हे तुम्हाला शोभून दिसतं? कमाल करतोयस अक्षय, काय झालंय तुला, मी तुझा फॅन आहे, मी तुला हात जोडून सलाम करतो. पूर्वी तुझे एक एक चित्रपट काय होते, जगाची हवा टाईट करुन सोडली होतीस तू. आता काय झालंय तुला..' देसाई यांनी अक्षय कुमारला कपिल शर्मा शो हा सलमान खानचा असल्याची आठवणही करुन दिला. त्या शोमध्ये तुझी गुंतवणूक तर नाही ना, असेही त्यांनी अक्षयला विचारले.

अक्षय कुमारचा नुकताच रिलीज झालेला सेल्फी बॉक्स ऑफिसवर छाप सोडू शकला नाही. बच्चन पांडे, सम्राट पृथ्वीराज, रक्षाबंधन आणि राम सेतू या चित्रपटानंतर अक्षयचा हा सलग पाचवा फ्लॉप आहे. अलीकडे, अक्षयने त्याच्या अपयशाबद्दल आत्मपरिक्षण करणार असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला होती की, हे आपल्या बाबतीत पहिल्यांदा घडत नाहीये. यापूर्वीही त्याच्या कारकिर्दीत एकावेळी सलग १६ फ्लॉप चित्रपट मिळाले हते. एक काळ असा होता की त्याचे सलग आठ चित्रपट चालले नाहीत. आता त्याचे सलग तीन-चार चित्रपट आले आहेत जे चालले नाहीत आणि सेल्फीमुळे आणखी एकाची भर पडली आहे.

देशभरातील बॉक्स ऑफिसवर सेल्फीची सुरुवात खूपच खराब झाली आहे. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये 10 कोटींची कमाई केली होती. आठवड्याच्या दिवसांतही त्यात आणखी सुधारणा होण्याची आशा काही स्पष्टपणे दिसली नाही. सेल्फी चित्रपटापूर्वी, अक्षय त्याच्या रक्षाबंधन, सम्राट पृथ्वीराज, कटपुतल्ली आणि राम सेतू यांसारख्या मागील चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर जादू निर्माण करण्यात अयशस्वी ठरला होता.

हेही वाचा - Kiara Advani With Her Bridesmaids : कियारा अडवाणी आणि ईशा अंबानी यांचे न पाहिलेले फोटो व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.