मुंबई : वादग्रस्त चित्रपट 'द कश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि त्याची पत्नी पल्लवी जोशी यांची 'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' ही वेबसीरिज सध्या चर्चेत आहे. 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटातील तथ्यांबाबतच्या वादामुळे या जोडप्याने ही मालिका तयार केली असून याद्वारे दोघेही त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहेत, ज्यासाठी त्यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावर बरीच टीका झाली होती. 'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' या वेबसीरिजची रिलीज डेट समोर आली आहे. ही वेब-सिरीज ११ ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
वेब-सिरीजचे केले प्रमोशन : विवेक आणि पल्लवी 'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' या वेब सीरिजचे प्रमोशन करण्यासाठी काश्मीरमधील शंकराचार्य मंदिरात गेले होते. या मंदिरात त्यांनी पूजा केली. दगम्यान 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला होता. या चित्रपटाला पाहण्यासाठी चित्रपटगृहामध्ये त्यावेळी खूप गर्दी वाढली होती. 'द कश्मीर फाइल्स' चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर होते. या चित्रपटाद्वारे कश्मीर हिंसाचारवर प्रकाश टाकला गेला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी समोर आल्या होत्या ज्यामुळे सामान्य जनता हादरून गेली होती.
'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाबद्दल : 'द कश्मीर फाइल्स' हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५० कोटींचा व्यवसाय केला होता. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर देखील या चित्रपटाला कमाईच्या बाबत कोणी रोखू शकले नाही. हा चित्रपट सतत कमाई करत राहिला. 'द कश्मीर फाइल्स' प्रदर्शित झाल्यानंतर विवेक आणि त्याची पत्नी पल्लवी यांना एका विभागाकडून खूप टार्गेट करण्यात आले होते. या जोडप्याला अनेक धमक्याही यावेळी आल्या होत्या. एवढेच नाही तर 'द काश्मीर फाईल्स'ला देशात आणि जगात अपप्रचार म्हणून संबोधले गेले होते. आता 'द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' या मालिकेत याबद्दल विवेक आणि पल्लवी अचूकपणे प्रश्नांची उत्तरे देणार आहे.
हेही वाचा :