ETV Bharat / entertainment

The Archies trailer out: झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज'चा कर्णमधुर, नेत्रसुखद ट्रेलर प्रदर्शित - अगस्त्य नंदा

सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा स्टार 'द आर्चीज' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

The Archies trailer out
द आर्चीज ट्रेलर रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 9, 2023, 12:46 PM IST

मुंबई - The Archies trailer out : झोया अख्तरचा 'द आर्चीज' हा चित्रपट जाहीर झाल्यापासून खूप चर्चेत आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर आज गुरुवारी रिलीज झाला. 7 डिसेंबर रोजी, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंग होणार आहे. या चित्रपटामध्ये सुहाना खान, खुशी कपूर , वेदांग रैना, मिहिर आहुजा, अदिती डॉट, युवराज मेंडा, तारा शर्मा आणि अगस्त्य नंदा हे कलाकर आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकजण या चित्रपटासाठी खूप आतुर आहेत. याआधी या चित्रपटाचे पोस्टर, टीझर आणि गाण्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. या चित्रपटाचा ट्रेलर खूप सुंदर आहे. ट्रेलरमध्ये स्टार किड्सचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे.

'द आर्चीज' ट्रेलर रिलीज : ट्रेलरमध्ये सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा, बाकी इतर कलाकारांसह, नाचत आणि आनंद लुटताना दिसत आहेत. 'द आर्चीज' हा चित्रपट नव्या युगाचा म्यूझिकल चित्रपट आहे. चित्रपटाची कहाणी मैत्री, स्वातंत्र्य प्रेम आणि बंडखोरीवर आधारित आहे. सुहाना खान रुपेरी पडद्यावर या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहे. या चित्रपटासाठी ती उत्सुक आहे. नुकत्याच झालेल्या संभाषणादरम्यान, झोयानं या तरुण कलाकारांवर कौतुकाचा वर्षाव केला. याशिवाय झोयानं सुहाना खानबद्दल बोलताना सांगितल की, 'सुहानाला तिच्या यशाच्या मार्गात फारसे अडथळे येणार नाहीत. तिच्याकडे गायनाची प्रतिभा आहे'.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'द आर्चीज' चित्रपटाबद्दल : झोया अख्तरनं यापूर्वी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर अगस्त्य नंदा, सुहाना खान, खुशी कपूर, डॉट, वेदांग रैना, युवराज मेंडा आणि मिहिर आहुजा या कलाकारांच्या पात्राच्या प्रोमो रिलीज केला होता. हा प्रोमो अनेकांना आवडला होता. या चित्रपटामध्ये आर्ची अँड्र्यूजची भूमिका अगस्त्य नंदा साकारत आहे. बेट्टी कूपरची भूमिका खुशी कपूर साकारत असून सुहाना खान वेरोनिका लॉजची भूमिका साकारली आहे. 'द आर्चीज' ही लोकप्रिय कॉमिक्स आहे. झोयानं अलीकडेच चित्रपटाच्या टीझर रिलीज केला होता. 1964 च्या काळात नॅरो गेजवरुन धावणाऱ्या टॉय ट्रेनच्या सहाय्यानं पर्वतावरील रिव्हरडेल या हिल स्टेशनवर पोहोचता यायचं. त्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचं कथानंक घडताना टीझरमध्ये दिसत होतं.

हेही वाचा :

  1. Samantha Ruth Prabhu : सामंथा रुथ प्रभूनं आरोग्य आणि नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा
  2. Elvish yadav : रेव्ह पार्टी आणि सापाचं विष पुरविल्या प्रकरणी एल्विश यादवची होणार पुन्हा चौकशी
  3. Bigg Boss 17 day 25 : ऐश्वर्या - अंकिताचं भांडण सुरूच, मन्नारा चोप्रानं घेतलं अभिषेक कुमारचं चुंबन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.