ETV Bharat / entertainment

The Archies film: सुहाना खान, खुशी कपूरच्या 'द आर्चीज'ची नवीन पोस्टर्स लॉन्च

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 5, 2023, 10:35 AM IST

The Archies film: सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि कुशी कपूर यांच्या बॉलिवूड पदार्पणाच्या द आर्चीज चित्रपटातील पात्रांची ओळख करुन देणारं नवीन पोस्टर रिलीज करण्यात आलंय. निर्माती झोया अख्तरनं पोस्टर शेअर करताच त्यावर सेलेब्रिटींच्या भरपूर प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

The Archies film
'द आर्चीज'ची नवीन पोस्टर्स लॉन्च

मुंबई - The Archies film: शाहरुखची लेक सुहाना खान, अमिताभचा नातू अगस्त्य नंदा आणि श्रीदेवीची मुलगी कुशी कपूर यांच्या बॉलिवूड पदार्पणाचा 'द आर्चीज' चित्रपट आजकाल सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरलाय. या चित्रपटाचं नवं पोस्टर निर्माती झोया अख्तरनं रिलीज केलंय.

बुधवारी झोयानं तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्टर रिलीज करुन सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि कुशी कपूर यांच्या चाहत्यांना ट्रीट दिली आहे. या चित्रपटात आदिती सैगल, वेदांग रैना आणि मिहिर आहुजा यांच्याही भूमिका आहेत. झोयानं सुहाना कपूरची ओळख वेरोनिका अशी करुन दिलीय. 'वेरोनिकाला काही स्वतःसारख्या गोष्टी प्रभावित करतात', असं पोस्टरला कॅप्शन देण्यात आलंय. पोस्टर शेअर झाल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.

'द आर्चीज' चित्रपटाच्या नवीन पोस्टरवर सुहानाला पाहून करण जोहरनं लिहिलंय, 'सुहाना तू सौंदर्यवान आहेस'. श्वेता बच्चननं तिला पाहून ‘लव्ह लव्ह लव्ह वेरोनिका’ असं लिहिलंय.

झोया अख्तरनं कुशीची पोस्टरवर बेटी कूपर अशी ओळख म्हणून करून दिलीय. याबद्दल तिनं लिहिलंय, 'लव्ह ( Love ) हा चार अक्षरांचा शब्द आहे आणि केक ( Cake ) सुद्धा. बेटी कपूर यापैकी दोन्ही आहे.' कुशी कपूरच्या पोस्टरवर करण जोहरनं प्रतिक्रिया देताना लिहिलंय, 'फार काळ प्रतीक्षा करु शकत नाही. खूप सुंदर.' कुशी कपूरच्या पोस्टरवर तिची बहिण जान्हवीनं अनेक हृदयस्पर्शी इमोजीसह प्रतिक्रिया दिलीय. 'द आर्चीज' चित्रपटातील इतर मनोरंजक पात्रंही पोस्टरवर आहेत.

'द आर्चीज' हा चित्रपट नव्या युगाचा म्यूझिकल चित्रपट आहे. ज्याच्यात आर्ची, बेट्टी, वेरोनिका, जुगहेड, रेगी, एथेल आणि डिल्टन ही पात्रे प्रेक्षकांना रिव्हरडेल या काल्पनिक डोंगराळ शहराची सफर घडवून आणतात. चित्रपटाची कथा मैत्री, स्वातंत्र्य प्रेम, द्वेष आणि बंडखोरी या गुणांचाही मेळ घालताना दिसते.

'द आर्चीज' या लोकप्रिय कॉमिक्सच्या भारतीय रूपांतरात अँड्र्यूजच्या भूमिकेत अगस्त्य नंदा, खुशी कपूर ही बेटी कूपर या भूमिकेत तर मिहिर आहुजा नेहमी भुकेल्या जुगहेड जोन्सच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात सुहाना खानने वेरोनिका लॉज ही व्यक्तीरेखा साकारली आहे., हार्टथ्रॉब रेगी मेंटल हे वेदांग रैना आणि युवराज मेंडा डिल्टन डोईलीच्या भूमिकेत दिसणार आहे.

झोयाने अलीकडेच चित्रपटाच्या टीझरचे लॉन्चिंग केलं होतं. 1964 च्या काळात नॅरो गेजवरुन धावणाऱ्या टॉय ट्रेनच्या सहाय्यानं पर्वतावरील रिव्हरडेल या हिल स्टेशनवर पोहोचता यायचं. त्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचं कथानंक घडताना टीझरमध्ये दिसलं होतं. 'द आर्चीज' हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

1. Ar. Rahman : सर्जन्स असोसिएशननं एआर रहमान यांच्यावर केला 'हा' आरोप....

2. Country Of Blind Teaser Out : हिना खान स्टारर 'कंट्री ऑफ ब्लाइंड'चा टीझर झाला प्रदर्शित; पहा व्हिडिओ...

3. Gayatri Joshi Car Accident: इटलीमध्ये स्वदेश फेम अभिनेत्री गायत्री जोशीचा झाला कार अपघात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.