मुंबई Tejas trailer is out : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या 'तेजस' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कंगना रणौत या चित्रपटात पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनाला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. दरम्यान आता 'तेजस'चा ट्रेलर हा समोर आला आहे. हा ट्रेलर 2 मिनिट 33 सेकंदाचा आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बर्याच गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. 'तेजस' चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज करण्यामागं एक खास कारण आहे आणि ते म्हणजे आज वायुसेना दिन आहे. या ट्रेलरमध्ये कंगनाचं लूक हे पायलट अधिकाऱ्याचे आहे. हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. जाणून घ्या कसा आहे तेजसचा ट्रेलर..
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'तेजस'चा ट्रेलर : ट्रेलरच्या सुरुवातीलाच एक आवाजात ऐकू येते, 'तुम्ही भारताला छेडले तर सोडणार नाही..'. यानंतर एक व्यक्ती सांगतो की, तेजस माझीचं विद्यार्थी आहे. त्यानंतर दुसरा एक व्यक्ती म्हणतो, तिला एका मिशनसाठी कंन्सीडर करत आहोत. त्यानंतर तेजसचे शिक्षक म्हणतात जर सोपे मिशन असेल, तर तेजस गिल (कंगना रणौत) ला पाठवू नका. पण एखादे मिशन खूप अवघड असेल आणि ते कोण करेल असा प्रश्न सर्वांना पडला असेल तर तिला नक्कीच पाठवा. यानंतर तेजसचे कुटुंब दाखविल्या जाते. त्यानंतर ती हवाई हल्ला करताना दिसते, याशिवाय काही न्यून चॅनलमध्ये पाकिस्तानमध्ये सापडलेल्या इंजिनिअरबद्दल सांगितल्या जाते. शेवटी म्हटले जाते की, 'महत्वाचे नाही की प्रत्येक युद्ध जिंकलं पाहिजे. आता रणांगणात युद्ध झालं पाहिजे.
'तेजस' चित्रपटाबद्दल : ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की तेजसचे एक मिशन असेल जे देशासाठी खूप महत्वाचे असेल. आता हे मिशन पूर्ण होईल की नाही हे चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. हा चित्रपट खूप जबरदस्त असेल अशी अपेक्षा आहे. ट्रेलरमध्ये कंगना राणौत तसेच इतर पात्रांची झलक पाहायला मिळते. ट्रेलर पाहून नक्कीच देशभक्तीची भावना निर्माण होते. कंगना रणौत तिच्या सिनेमॅटिक करिअरमध्ये पहिल्यांदाच ती एअरफोर्स पायलटच्या भूमिकेत दिसत आहे. तेजस हा चित्रपट 27 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. कंगना राणौतसोबतच अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशिष विद्यार्थी आणि विशाक नायर हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आरएसव्हिपी (RSVP) निर्मित 'तेजस'चे लेखन आणि दिग्दर्शन सर्वेश मेवाडा यांनी केले आहे.
हेही वाचा :