मुंबई - कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ((Cannes International Film Festival) जगातील प्रतिष्ठित फिल्म्स फेस्टीवल्समधील एक आहे. येथे चित्रपट सिलेक्ट होणे हे अभिमानास्पद समजले जाते. अत्यंत मानाच्या या चित्रपट महोत्सवात जागतिक सिनेसृष्टीतील बडी मंडळी हजेरी लावतात. या महोत्सवातील रेड कार्पेट वर चालण्याचा मान खूप निवडक सेलिब्रिटीजना मिळतो. दरवर्षी भारतीय चित्रपटसृष्टीतील काही कलाकार येथे हजेरी लावतात. ऐश्वर्या राय, दीपिका पदुकोन, प्रियांका चोप्रा, कतरिना कैफ, सोनम कपूर आदी अनेक अभिनेत्रींनी या रेड कार्पेटवर लक्ष वेधून घेतलं. आता यावर्षी सनी लिओनी कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर डेब्यू करताना दिसणार आहे.
![कान फिल्म फेस्टीव्हलच्या रेड कार्पेटवर सनी लिओनी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-sunny-leone-cannes-red-carpet-mhc10001_16052023173954_1605f_1684238994_945.jpg)
सनी लिओनीची नवी ओळख - सनी लिओनी या नावाभोवती वेगळंच वलय आहे. अमेरिकेतून ती जेव्हा भारतात करियर करण्यासाठी आली तेव्हा तिला फिल्म इंडस्ट्रीकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ती आधी पॉर्न चित्रपटांत काम करीत असल्यामुळे सार्वजनिकरीत्या तिच्याशी कोणी व्यावसायिक सबंध ठेवण्यास राजी नव्हते. परंतु तिने हार मानली नाही आणि आपले प्रयत्न सुरू ठेवले. गेल्या काही वर्षांत सनी लिओनी मोठी सेलिब्रिटी म्हणून फिल्म इंडस्ट्रीच्या प्रांगणात बागडते आहे. ती चित्रपट, टीव्ही शोज मध्ये बिझी असते. नुकताच तिने आपला वाढदिवस आपल्या कुटुंबीयांसमवेत साजरा केला.
![कान फिल्म फेस्टीव्हलच्या रेड कार्पेटवर सनी लिओनी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-sunny-leone-cannes-red-carpet-mhc10001_16052023173954_1605f_1684238994_3.jpg)
सनी लिओनीचा नवा चित्रपट - तिचा आगामी चित्रपट आहे केनेडी, ज्याचे दिग्दर्शन केले आहे अनुराग कश्यप याने. सनीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता सगळेच बाळगून आहेत. हा एक 'मर्डर मेलडी' असून नुकताच त्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यात सनी लिओनी ने केलेल्या कामाचे कौतुक होत असून केनेडी बद्दलची उत्सुकता दुप्पट झाली आहे. केनेडी हा एकमेव भारतीय चित्रपट आहे ज्याची कान २०२३ च्या प्रतिष्ठित ज्युरींनी 'मिडनाईट स्क्रीनिंग' साठी निवड केली आहे. सनी लिओनी तिच्या आकर्षक आणि स्टायलिश पोशाखांसाठी प्रसिद्ध आहे. फॅशन समीक्षकांकडून तिला नेहमीच दाद मिळत आली आहे. आता सनी लिओनी आपल्या फॅशनची जादू कान २०२३ च्या रेड कार्पेटवर दाखवण्यासाठी खूप उत्साहित आहे.
हेही वाचा - Srk Reveals Buying Mannat : मन्नत खरेदीनंतर शाहरुख झाला होता कंगाल, म्हणून गौरी बनली 'इंटिरीयर डिझायनर'