ETV Bharat / entertainment

Sunny Deol : सन देओल धर्मेंद्रसोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर, पिझ्झा खातानाचा फोटो व्हायरल - sunny shared a photo

Sunny Deol : सनी देओलनं नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो आपल्या वडिलांसोबत पिझ्झाचा आस्वाद घेत आहे. दरम्यान आता या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहे.

Sunny Deol
सनी देओल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 4:45 PM IST

मुंबई - Sunny Deol : सनी देओलनं यापूर्वी 'गदर 2' या चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहात सुरू आहे. पूर्वीपेक्षा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक कमी जात आहेत. या चित्रपटाच्या यशानंतर सनी देओल वडील धर्मेंद्र यांच्यासोबत अमेरिकेत सुट्टी घालवत असल्याची बातमी समोर आली आहे. दरम्यान आता सनी देओलनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो आणि धर्मेंद्र पिझ्झाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. याशिवाय आता सनीनं शेअर केलेल्या फोटोवर ईशा देओलनेही कमेंट केली आहे.

धर्मेंद्रची प्रकृती : काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांची प्रकृती ठीक नसल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे सनी त्यांना घेऊन अमेरिकेला गेला होता. सनी आणि धर्मेंद्र हे जवळपास 20 दिवस अमेरिकेला राहणार आहेत. दरम्यान सनीनं धर्मेंद्रच्या प्रकृतीबद्दलच्या बातम्यावर खंडन केले आहेत आणि तो सुट्टी घालवण्यासाठी परदेशात गेल्याचं आता कळत आहे. सनीनं धर्मेंद्रसोबतचा एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये तो आपल्या वडिलांवरील प्रेम व्यक्त करत आहे. सनीनं फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, 'पापा आणि मी शांतपणे पिझ्झाचा आनंद घेत आहोत'. यासह त्यानं आपल्या पोस्टवर हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

चाहत्यांनी केल्या कमेंट : सनीनं शेअर केलेल्या फोटोवर त्याचे चाहते कमेंट करत आहे. या पोस्टवर कमेंट करत एका चाहत्यानं लिहलं, 'नमस्कार सुप्रभात पापाजी लव्ह यू देओल परिवार' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहलं, 'लव्ह यू पाजी' याशिवाय आणखी एका चाहत्यानं लिहलं, 'बाप आणि लेकाची जगातील सर्वोत्तम जोडी' अशा अनेक कमेंट या पोस्टवर येत आहेत. तसेच काही चाहते या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.'गदर 2'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटानं 519.43 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाची जगभरातील कमाई 650 कोटींच्या पुढे गेली आहे.

हेही वाचा :

  1. Animal Teaser: रणबीर कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' चित्रपटाची टीझर रिलीज डेट आली समोर...
  2. Shilpa Shetty bring Bappa home : शिल्पा शेट्टीच्या घरी गणेश उत्सवाची तयारी, बाप्पाच्या मूर्तीचे घरी आगमन
  3. Jawan box office collection day 12 : शाहरुख खानचा 'जवान' जगभरात करत आहे धूम...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.