मुंबई - Suniel Shetty on Bollywood : स्टार व्हर्सेस फूड सर्व्हायव्हल या कुकिंग रिअॅलिटी शोसाठी बॉलिवूडचा अण्णा सुनील शेट्टी सज्ज झालाय. या शोच्या निमित्तानं बोलताना सुनिलनं सांगितलं की, हिंदी चित्रपटसृष्टीने एकत्र येण्याचे महत्त्व गमावलंय. चित्रपट क्षेत्रातील लोक कठीण प्रसंगी फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. या शोच्या आगामी एपिसोडमध्ये शेफ रणवीर ब्रारसोबत कर्नाटकातील कुर्ग परिसारात 15 किमीच्या पट्ट्यात भ्रमंती करताना दिसणार आहेत. यामध्ये शेफसोबत सुनिल शेट्टी आणि संजय दत्त जंगलात अन्न शोधताना दिसतात. या दरम्यान बोलताना सुनिल शेट्टी म्हणाला की, बॉलिवूडमध्ये एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे थांबले आहे.
'आम्ही नेहमीच एक दुसऱ्यांसाठी होतो, संघटनेसाठी एकत्र काम करायचो, आमचा एकसंघ आवाज होता. मात्र आज जेव्हा आमच्यावर लोक चिखलफेक करतात तेव्हा कोणीही आमच्या बचावासाठी येत नाही. कोणी काहीही बोलत नाहीत कारण आम्हा आता एकटं पडलं आहोत. आता कोणीही एकमेकांसाठी उभे राहत नाही. तो आवाज राहिला नाही. सर्व काही कमजोर झालंय', अशी खंत सुनिल शेट्टीनं व्यक्त केली.
स्टार व्हर्सेस फूड सर्व्हायव्हलच्या शुटिंगबद्दलचा अनुभव सांगताना सुनिल शेट्टी म्हणाला की, हा एक प्रेम , हशा, मैत्री आणि निसर्गाशी जोडलेल्या खोल भावनांनी भरलेला एक सखोल प्रवास होता. चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी बोलताना सुनील शेट्टी म्हणाला की, 'हा प्रेम, हशा, मैत्री आणि निसर्गाशी जोडलेल्या खोल भावनांनी भरलेला एक सखोल प्रवास होता.निसर्गाच्या निरव शांततेत स्वयंपाक करणं हा माझ्यासाठी नेहमीच आनंदाचा स्रोत राहिला आहे. अर्थातच, संजय दत्त हा मूळचा रॉकस्टार, त्यानं आपल्या अनोख्या चवीची त्यात भर टाकली. प्रत्येक क्षण करिष्माई आकर्षण भरलेलं होतं. मला आवडणारं सर्व काही या शोमध्ये आहे. प्रिय लोकांसोबत जेवण शेअर केल्यानं मिळणारा आनंद द्विगुणीत होतो. शेफ रणवीर ब्रारचं या प्रवासातील योगदान मी कसं काय विसरु शकेन. त्याच्या शिवाय हा प्रवास पूर्णच होऊ शकला नसता.', असे सुनिल शेट्टी म्हणाला.
हेही वाचा -