अबुधाबी: बॉस्को मार्टिस हे बॉलिवूडमधील फार प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे सध्याला आयफा रॉक्स हा कार्यक्रम हा अबुधाबी सुरू आहे. या कार्यक्रमात अनेक कलाकार या ठिकाणी गेले आहे. आयफा रॉक्स या कार्यक्रमातून अनेक प्रकारचे व्हिडिओ सध्याला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र सध्याला बॉस्को यांची एक मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत ते अभिनेता शाहरुख खानच्या मुलीबद्दल बोलतांना दिसत आहे. ते सुहाना खानबद्दल बोलतांना म्हणाले,
बॉस्को मार्टिस केली सुहानाची प्रशंसा : सुहानाने वडील शाहरुख खान यांच्यातील 'अॅब्सॉर्बिंग आणि लर्निंग' ही गुणवत्ता संपादन केली आहे, असे कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस म्हटले. बॉस्को यांनी सुहानासोबत 'द आर्चीजमध्ये काम केले आहे. सुहानाने, लोकप्रिय अमेरिकन कॉमिक्सच्या पात्रांवर आधारित नेटफ्लिक्सच्या लाइव्ह-अॅक्शन म्युझिकल द आर्चीज चित्रपटांमध्ये काम केले आहे. झोया अख्तरने याचे दिग्दर्शन केले आहे. पुढे बॉस्को म्हणाले की, सुहाना सुपरस्टारची मुलगी असल्याचे कधीच दाखवत नाही, तिचा तिच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. 'माझ्यासाठी ती अपवाद आहे. ती मेहनत आहे. 'तिचे व्यक्तिमत्त्व फार वेगळे आहे. तुम्ही तिच्यासोबत काम करू शकता आणि ती फक्त आत्मसात करत राहते आणि शिकत राहते. एका कलाकारासाठी ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. मला वाटते की ती तिच्या वडिलांकडून सर्व शिकली आहे. हे विलक्षणीय आहे, बॉस्को हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर असून यांनी आयफा अवॉर्ड्स आणि वीकेंडच्या वेळी त्यांनी दिलेल्या मुलाखतीत सुहानाबद्दल सांगितले. बॉस्को आणि त्याचा कोरिओग्राफी पार्टनर सीझर गोन्साल्विस यांनी शाहरुखसोबत स्वदेस, जब हॅरी मेट सेजल, रईस, झिरो आणि अलीकडे ब्लॉकबस्टर हिट पठाण यांसारख्या चित्रपटांमध्ये कोरिओग्राफी केले आहे.
आयफा रॉक्स : शुक्रवारी रात्री, आयफा रॉक्स समारंभात बॉस्को आणि सीझरने भूल भुलैया 2 च्या टायटल ट्रॅकसाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार जिंकला. बॉस्कोने सांगितले की, यापूर्वी 2007 च्या सायकोलॉजिकल कॉमेडी हॉररमध्ये अक्षय कुमारवर कार्तिक आर्यनसोबत चित्रित केलेला ट्रॅक पुन्हा तयार करणे हे एक मोठे आव्हान होते.तो म्हणाला, 'आम्हाला एक वेगळी निर्मिती करायची होती आणि पूर्वी ज्या स्टाईलमध्ये आणि ज्या पद्धतीने शूट करण्यात आलं होतं त्याच्याशी तुलना आता होऊ शकत नाही. कार्तिकसोबत आम्ही उत्तम प्रकारे काम केले आहे. ते खरंच छान होते. तसेच चित्रपट निर्माते समीर विद्वांस दिग्दर्शित 'सत्यप्रेम की कथा' या आगामी चित्रपटात कोरिओग्राफरच्या या जोडीने पुन्हा आर्यनसोबत एकत्र काम केले आहे. याशिवाय, त्यांनी वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या नितेश तिवारीच्या 'बावल' चित्रपटासाठी गाणी देखील कोरिओग्राफ केली आहेत.