मुंबई : 'या भूमिकेसाठी मला खूप वाट पाहावी लागली. फिल्मचे शूटिंग लवकरंच सुरू होणार आहे. या भूमिकेचे खूप टप्पे आहेत, असे अभिनेत्री मानसी नाईक म्हणाली. मानसीच्या वाढदिवसानिमित्त निर्मात्यांनी वेब फिल्मच्या पोस्टरचे अनावरण केले. मानसी एका हिंदी वेब फिल्ममध्ये दिसून येणार आहे. पी ए एन्टरटेन्मेंट निर्मीत या फिल्मचे नाव सिफर असे आहे. या फिल्ममध्ये मानसी एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
![Sifer](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-mansi-naik-hindi-wenfilm-sifar-poster-out-mhc10001_03022023192947_0302f_1675432787_1056.jpg)
सिफरचा अर्थ : या भूमिकेबद्दल मानसी म्हणाली, सिफरचा अर्थ शून्य असा आहे. एका अनाथ मुलीचा प्रवास यातून दाखवण्यात आला आहे. याला सिफर का म्हटले आहे, ते ही फिल्म पाहूनच लक्षात येईल. वाढदिवसाच्या दिवशी या फिल्मची घोषणा करताना मला आनंद होत आहे.
अनाथ मुलीची कहाणी : मानसी पुढे म्हणाली की, शून्यातून आयुष्य फुलवणाऱ्या अनाथ मुलीची कहाणी, 'सिफर', मधून दिसेल. मला ही भूमिका मिळायला बरीच वर्षे वाट पाहावी लागली. गेली अनेक वर्षे डान्सर म्हणून लोकांनी पसंत केले आहे. पण या भूमिकेमुळे वेगळी मानसी दिसून येईल. चैतन्य आणि दिपक पांडुरंग राणे यांची निर्मीती असलेली या फिल्मचे दिग्दर्शन विनोद वैद्य यांनी केले आहे. तर धनंजय कुलकर्णी याचे छायाचित्रण संचालक आहे. या फिल्ममध्ये हिंदीतील अनेक नामवंत कलाकार आहेत.
'वाट माझी बघतोय रिक्षावाला' फेम अभिनेत्री : मानसी नाईक ही मराठी चित्रपटसृष्टीतील एक भारतीय नृत्यांगना आणि अभिनेत्री आहे. मराठी चित्रपटातील गाणे 'वाट माझी बघतोय रिक्षावाला' आणि मर्डर मेस्त्रीसारख्या चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी ती ओळखली जाते. 2016 च्या जलसा या मराठी विनोदी चित्रपटातील 'बाई वड्यावर या' या गाण्यावर अभिनेत्री मानसी नाईकने नृत्य सादर केले होते.
घटस्फोटाची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला : मराठी इंडस्ट्रीतील खळबळजनक जोडप्यांपैकी एक मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांनी अलीकडेच लग्नाच्या एका वर्षात घटस्फोटाची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला. जानेवारी 2021 मध्ये लग्न झालेल्या या जोडप्याने घटस्फोट घेतला आणि त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दोन महिने आधी वेगळे होण्याची घोषणा केली. एका मुलाखतीत मानसीला विचारले की, तुझा लग्नावरचा विश्वास उडालाय का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, माझा लग्नावरचा विश्वास अजिबात उडालेला नाही. कारण लग्न हे फारच खास असते.
हेही वाचा : Nora Fatehi Birthday : ५ हजार रुपये घेऊन भारतात आली होती नोरा फतेही, आज आहे करोडपती