ETV Bharat / entertainment

शाहरुखने केली राजकुमार हिरानीसोबत चित्रपटाची घोषणा, पाहा व्हिडिओ - शाहरुखच्या चित्रपटाची घोषणा

शाहरुख खानने त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवर राजकुमार हिरानी यांच्यासोबतच्या त्याच्या चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला आहे ज्याचे नाव 'डंकी' आहे. तापसी पन्नूची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

शाहरुखने केली राजकुमार हिरानीसोबत चित्रपटाची घोषणा

author img

By

Published : Apr 19, 2022, 5:26 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान राजकुमार हिराणीसोबत चित्रपट बनवण्याची प्रतीक्षा करीत होता. त्याची दीर्घकाळ सुरू असलेली ही प्रतीक्षा आता संपली आहे. त्याचा हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे. किंग खानने आता एका मनोरंजक व्हिडिओसह चित्रपटाची घोषणा केली आहे.

मंगळवारी शाहरुखने त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवर हिरानीसोबतच्या त्याच्या चित्रपटाचा प्रमोशनल व्हिडिओ शेअर केला ज्याचे नाव डंकी आहे. व्हिडिओ शेअर करताना, शाहरुखने लिहिले, "प्रिय राजकुमार हिरानी सर, आप तो मेरे सांताक्लॉज निकले. आप शुरू करो मैं समय पे पाहुंच जाऊंगा. अॅक्चुली मैं तो सेट पर ही रहने लगुंगा! शेवटी तुमच्यासोबत काम करण्यासाठी नम्र आणि उत्साही वाटत आहे. . 22 डिसेंबर 2023 रोजी तुमच्या सर्वांसाठी #Dunki घेऊन येत आहे."

आधी कळवल्याप्रमाणे चित्रपटाचे निर्माते मुंबईच्या फिल्मसिटी स्टुडिओमध्ये चित्रीकरण सुरू करतील जेथे पंजाब गावाचा सेट उभारण्यात आला आहे. मुंबईच्या शुटिंग शेड्यूलनुसार टीम एप्रिल किंवा मे मध्ये पंजाबच्या शेतात शूटिंग करणार आहे. चित्रपटाचे मुख्यतः चित्रीकरण मुंबईत होणार असले तरी, टीम 10 दिवसांच्या शूटसाठी यूके आणि नंतर बुडापेस्टला जाणार आहे. या चित्रपटात तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. डंकी 22 डिसेंबर 2023 रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे.

हेही वाचा - शेफ तरला दलाल यांच्या बायोपिकमध्ये झळकणार हुमा कुरेशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.