मुंबई - आपल्या ब्लॉकबस्टर 'पठाण' चित्रपटासाठी प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवणाऱ्या बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने एक नवी कार खरेदी केली आहे. शाहरुख हा कारचा शौकिन आहे. त्याच्या ताफ्यामध्ये अनेक आलिशान कार्सचा समावेश आहे. जगातील अनेक महागड्या लक्झरियर गाड्यातून मिरवण्याचा त्याला शौक आहे. पठाण चित्रपटाने हजार करोडहून अधिक कमाई केल्यानंतर काही कोटींची गाडी घेणे त्यासाठी काही फार मोठी गोष्ट नाहीय त्याच्या ताफ्यामध्ये ऑडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज-बेंझ सारख्या प्रभावी गाड्या आहेत. आता त्याच्याकडे रोल्स रॉइसची नवी गाडी आली आहे.
-
Post the grand success of #Pathaan King Khan #SRK buys new Rolls Royce Cullinan Black Badge car worth 10 cr pic.twitter.com/DUVXnbgdGY
— Vasim Tamboli (@iamvasimt) March 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Post the grand success of #Pathaan King Khan #SRK buys new Rolls Royce Cullinan Black Badge car worth 10 cr pic.twitter.com/DUVXnbgdGY
— Vasim Tamboli (@iamvasimt) March 27, 2023Post the grand success of #Pathaan King Khan #SRK buys new Rolls Royce Cullinan Black Badge car worth 10 cr pic.twitter.com/DUVXnbgdGY
— Vasim Tamboli (@iamvasimt) March 27, 2023
शाहरुखची नवी कार - त्याच्या ताफ्यात सामील होणारी नवीनतम कार आहे रोल्स रॉयस कुलीनन ब्लॅक बेज एसयूव्ही ( Rolls-Royce Cullinan Black Badge SUV ). ज्याची किंमत रु. 10 कोटींहून अधिक आहे. शाहरुख खानच्या या नवीन कारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूडचा बादशाह नुकताच रात्री मुंबईच्या रस्त्यावर आपली नवी कार चालविताना दिसला. शाहरुखची नवीन कार आर्क्टिक व्हाईट पेंटमध्ये येते तर आतील भाग पांढऱ्या लेदरशी जुळतात. त्यावर त्याची सिग्नेचर '0555' नंबर प्लेटही आहे.
शाहरुखच्या ताफ्यातील इतर गाड्या - 'पठाण'च्या प्रचंड यशामुळे सुपरस्टार लक्झरी एसयूव्हीवर चमकला आहे. शाहरुख खानकडे फॅंटम ड्रॉपहेड कूप, लँड रोव्हर रेंज रोव्हर स्पोर्ट आणि इलेक्ट्रिक BMW i8 आहे. त्याच्याकडे टोयोटा लँड क्रूझर, मित्सुबिशी पजेरो, आणि ह्युंदाई सॅन्ट्रो आणि क्रेटा सोबत BMW 6-सिरीज कन्व्हर्टेबल आहे.
कार शौकिन सेलेब्रिटी - बॉलिवूडमधील अनेक सेलेब्रिटी आलिशान गाड्यांचे शौकिन आहेत, तर काहींकडे एखाद दुसरीच पण भव्य आणि लक्झरीयस गाड्या आहेत. रस्त्यावरुन गाडी जात असताना लोक लांबूनही या गाड्यांमुळे व त्याच्या नबर प्लेट्समुळे लोक आतमध्ये कोण सेलेब्रिटी आहे हे ओळखतात. शिवाय अनेकदा अशी गाड्यांच्या मागेपुढे सुरक्षा रक्षकांचे कडेही असते. अमिताभ बच्चन, ह्रतिक रोशन, सलमान खान, चिरंजीवी, रजनीकांत, ज्युनियर एनटीआर, प्रियंका चोप्रा जोनास यांच्याकडेही अशाच आलिशान गाड्यांचा ताफा आहे. अनेक वेळा चित्रपट जेव्हा बॉक्स ऑफिसवर हिट होतो तेव्हा हे सेलेब्रिटी आपल्या दिग्दर्शकांसाठी अशा महागड्या गाड्या गिफ्ट करतानाही यापूर्वी दिसले आहे.
हेही वाचा - Allegations Against Danish Alfaj : गायक दानिश अल्फाज विरोधात पत्नीकडून छळ आणि लैंगिक शोषणाचा आरोप