ETV Bharat / entertainment

SRK at Ambanis Ganesh :अंबानींच्या घरी गणेश दर्शनाला कुटुंबीयांसह शाहरुख खानची ग्रँड एन्ट्री - Ambanis Ganesh Chaturthi

SRK at Ambanis Ganesh :अभिनेता शाहरुख खाननं अंबानी कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी त्याच्यासोबत पत्नी व मुलंही होती. शाहरुखच्या आगमनाकडे सर्वांचेच लक्ष वेधलं गेलं होतं.

SRK at Ambanis Ganesh
गणेश दर्शनाला कुटुंबीयांसह शाहरुख खानची ग्रँड एन्ट्री
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 10:13 AM IST

मुंबई - SRK at Ambanis Ganesh :सुपरस्टार शाहरुख खानने मंगळवारी रात्री अंबानी कुटुंबीयांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. मुंबईतील अँटेलिया बिल्डिंगमध्ये अंबानी यांच्या घरी मोठ्या संख्येनं लोक गणेश दर्शनसाठी आले होते. या सर्वांचे लक्ष शाहरुखच्या येण्यानं वेधलं गेलं. यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना, धाकटा मुलगा अबराम आणि सासू सविता छिब्बरही आल्या होत्या.

खान परिवाराने या प्रसंगी पारंपरिक भारतीय वेशभूषा परिधान केली होती. त्यांनी फोटोसाठी पोजही दिल्या. पठाणी कुर्ता आणि सलवारमध्ये शाहरुख खान अतिशय देखणा दिसत होता. त्याने आपले लांब केस एका छोट्या पोनीटेलमध्ये बांधले होते. गौरीने बेज रंगाच्या चमकदार ड्रेस परिधान केला होता. सुहानाने हस्तीदंती रंगाचा ड्रेस घातला होता तर छोटा अबराम निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होता. शाहरुखने आपल्या तमाम चाहत्यांना गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देताना शाहरुखने सोशल मीडियावर लिहिलंय की, 'गणपत्ती बाप्पाचं घरी स्वागत आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भगवान गणेश पूजनाच्या या अद्भुत दिवसाच्या शुभेच्छा. भगवान गणेश आपल्या सर्वांना आनंद, बुद्धी, उत्तम आरोग्य आणि भरपूर मोदक खायला देवोत !!!.'

शाहरुख खानच्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छांवर अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्याला 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत प्रतिसाद दिला. अनेकांनी आपल्या लाडक्या एसआरकेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देणं पसंत केलंय.

दरम्यान, शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे अनेक विक्रम प्रस्थापित करतोय. केवळ १३ दिवसात चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा आकडा पार केलाय. यापूर्वी त्याच्या 'पठाण' चित्रपटाने हा आकडा रिलीजच्या २३ व्या दिवशी ओलांडला होता. जगभर या चित्रपटाला अभूतपूर्व प्रतिसाद प्रेक्षक देत आहेत. हा चित्रपट अ‍ॅटली कुमार यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यात नयनतारा आणि विजय सेतुपतीसह संजय दत्त, दीपिका पदुकोण, सुनिल ग्रोव्हर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत, अ‍ॅटलीने शाहरुखसोबत काम करण्याचा निर्णय कसा घेतला याबद्दलचा खुलासा केला. तो म्हणाला, 'मी बिगिलच्या शुटिंगमध्ये बिझी असताना अचानक एके दिवशी शाहरुख सरांचा फोन आला. मी त्यांना भेटायला विमानाने मुंबईला गेलो आणि खान सरांना भेटलो. आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा तो क्षण होता. ते नम्रपणे म्हणाले, 'मला तुमच्यासोबत काम करायचंय.' हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. मी त्यांना म्हणालो, सर माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे, पण मी फक्त चारच चित्रपट केलेत. ते म्हणाले, तुम्ही ते करु शकता, प्लिज अ‍ॅटली माझ्यासाठी चित्रपट करा. मला तुमच्या विश्वाचा एक भाग बनायचंय. मी तिथून चेन्नईला परतलो आणि पुढील आठ महिने 'जवान' च्या स्क्रिप्टवर काम केलं. अखेर आम्ही 'जवान' चित्रपट घेऊन आलो आहोत.'

हेही वाचा -

१. Ganesh Chaturthi 2023: आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, अनन्या पांडेसह सेलेब्रिटींनी दिल्या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा

२. Shehnaaz Gill on Niagara Falls : शहनाज गिलने आईसह लुटला नायगरा धबधब्याचा आनंद, पाहा व्हिडिओ

३. ICC World Cup 2023: बिग बी, सचिन तेंडुलकर नंतर बीसीसीआयने रजनीकांतला दिलं गोल्डन तिकीट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.