ETV Bharat / entertainment

Sridevi's 60th Birthday : श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूर, जान्हवी कपूरने थ्रोबॅक फोटो केला शेअर... - थ्रोबॅक फोटो केला शेअर

बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवीचा आज वाढदिवस आहे. या खास प्रसंगी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी कपूर, जान्हवी कपूरने सुंदर जुने फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये श्रीदेवी खूप खुश दिसत आहे.

Sridevi 60th Birthday
श्रीदेवीचा वाढदिवस
author img

By

Published : Aug 13, 2023, 12:30 PM IST

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीचे आजही लाखो चाहते आहे. तिची प्रसिद्ध अभिनय कारकीर्द ४ दशकांहून अधिक काळ होती. श्रीदेवीने अनेक साऊथ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी, श्रीदेवीचे अनपेक्षितपणे निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला आणि तिच्या चाहत्यांना धक्का बसला. दरम्यान वाढदिवसाच्या या खास प्रसंगी, श्रीदेवीचे पती-चित्रपट निर्माते बोनी कपूरने एक थ्रोबॅक फोटो शेअर केला. त्यांनी पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर मुलगी खुशी कपूरनेही आईची आठवण करून देणारा एक जुना फोटो शेअर केला आहे. याशिवाय जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये श्रीदेवीसोबत बोनी कपूर दिसत आहे.

सोशल मीडियावर फोटो केले शेअर : खुशी कपूरने फोटो शेअर करत फोटोवर लिहले 'हॅपी बर्थडे मम्मा' (व्हाइट हार्ट) इमोजीसह कॅप्शन दिले आहे. या फोटोमध्ये श्रीदेवी मोठी स्माईल करताना खुशी आणि जान्हवीसोबत पोझ देत आहे. श्रीदेवीने या फोटोमध्ये पारंपारिक निळ्या रंगाची कांजीवरम सिल्क साडी नेसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये ती नेहमीप्रमाणेच आकर्षक दिसत आहे. याशिवाय तिने यावर दागिणे घातले आहे. तसेच फोटोमध्ये जान्हवी कपूर आणि खुशी कपूरने गुलाबी रंगाचे टॉप घातले आहे. जान्हवी कपूर आणि बोनी कपूरने शेअर केलेल्या फोटोमध्ये श्रीदेवी ही काळ्या जॅकेटमध्ये दिसत आहे. याशिवाय बोनी कपूर या फोटोमध्ये ग्रे रंगाच्या जॅकेटसह टोपी घालून दिसत आहे. फोटोमध्ये बोनी कपूर श्रीदेवीला आपल्या मिठीत पकडताना दिसत आहे. हा सुंदर फोटो शेअर करत बोनी कपूरने लाल हार्ट इमोजीसह 'हॅपी बर्थडे' लिहिले. हीच पोस्ट जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

श्रीदेवीचे पुरस्कार : श्रीदेवीचे खरे नाव श्री अम्मा यंगर अय्यपन होते. श्रीदेवी अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिला भारतीय चित्रपटसृष्टीतील 'पहिली महिला सुपरस्टार' म्हणून ओळखले जाते. तसेच तिने अनेक पुरस्कार देखील जिंकले, ज्यात 'फिल्मफेअर पुरस्कार' 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार', 'केरळ राज्य चित्रपट पुरस्कार', 'नंदी पुरस्कार' आणि 'तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार' यांचा समावेश आहे. श्रीदेवीला 'फिल्मफेअर' 'जीवनगौरव पुरस्कारा'सह चार 'फिल्मफेअर पुरस्कार' मिळाले आहेत.

हेही वाचा :

  1. Sridevi 60th Birthday : श्रीदेवीच्या ६०व्या वाढदिवसाची गुगलकडून खास आठवण, डुडलमध्ये दाखविला चित्रपटसृष्टीतील प्रवास
  2. Suhana Khans kind gesture : सुहाना खानच्या दातृत्वाने जिंकली अनेकांची मने - पाहा व्हिडिओ
  3. IFFM 2023 : करण जोहरची बॉलिवूडमध्ये २५ वर्षे, योगदानाबद्दल मेलबोर्न फेस्टीव्हलमध्ये सन्मान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.