ETV Bharat / entertainment

सोनाक्षी सिन्हाचा लग्नाआधीच गोंधळ, झहीर इक्बालसोबत खरंच होणार का लग्न?

author img

By

Published : Jun 8, 2022, 1:55 PM IST

सोनाक्षी सिन्हा लग्न करणार असल्याची चर्चा सध्या जोरदार आहे. अलिकडेच सोनाक्षीचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता व त्यात तिने आय लव्ह यू असे लिहिले होते. यानंतर सोनाक्षीने आणखी एक व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांना गोंधळात टाकले आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या खूप चर्चेत आहे. अलीकडेच त्यांच्या लग्नाच्या बातम्यांनी जोर धरला होता. खरं तर, एका सोशल मीडिया पोस्टमध्ये सोनाक्षीचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बालने सोनाक्षीसाठी आय लव्ह यू असं लिहिलं होतं... त्यानंतर सोनाक्षीनेही रिप्लाय करताना लव्ह यू असं लिहिलं होतं. या पोस्टनंतर सोनाक्षी आणि झहीरचे नाते पक्के झाले असून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांना वेग आला आहे. आता सोनाक्षी सिन्हाने लग्नाच्या या अफवांवर आपले मौन सोडले आहे. सोनाक्षीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून सर्व काही स्पष्ट केले आहे. पण काहींना अजूनही हा व्हिडिओ पाहून गोंधळ उडल्याचे दिसत आहे.

सोनाक्षीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती एका खोलीत बसलेली दिसत आहे. या व्हिडीओसोबत तिने लिहिले आहे की, 'मी मीडियाला विचारते, तुम्ही माझ्या लग्नाच्या मागे का हात धुवून लागला आहात?' मग सोनाक्षी मीडिया बनून शाहरुखच्या आवाजातील डायलॉग म्हणते, , 'अच्छा लगता है मुझे, बहुत मजा आता है." या रीलच्या कॅप्शनमध्ये सोनाक्षीने मीडियाला उद्देशून लिहिलंय, 'प्रपोजल, रोका, मेहंदी, संगीत सब फिक्स कर ही लिया हो तो प्लीज मुझे बता दो'.

सोनाक्षीच्या व्हिडिओवर झहीर इक्बालची प्रतिक्रिया - सोनाक्षीच्या या व्हिडिओवर अभिनेत्रीचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बालची कमेंटही आली आहे. इक्बालने खूप हसणारे इमोजी शेअर केले आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून अनेक यूजर्स हसत आहेत. एका युजरने लिहिले, 'बहुत क्यूट सोना...' तर दुसऱ्याने अभिनेत्रीला फटकारले आणि लिहिले, 'मॅडम कृपया मला सांगा की हा कोणत्या चित्रपटातला आणि कोणत्या सीनचा डायलॉग आहे'.

सोनाक्षीच्या वाढदिवसानिमित्य शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत - झहीर इक्बालने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये सोनाक्षी सिन्हा दिसत आहे. झहीर इक्बालने सोनाक्षीसोबत घालवलेल्या सुंदर क्षणांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा... मला न मारल्याबद्दल धन्यवाद, मी तुझ्यावर प्रेम करतो, येणाऱ्या काळात आपण असेच खाऊ, प्रेम करू आणि हसत राहू. या पोस्टसोबत झहीरने 'आय लव्ह यू' असे स्पष्ट शब्दात लिहिले आहे. या पोस्टमुळे झहीरने आपले रिलेशन अधिकृत करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही.

अभिनेत्री सोनाक्षी आणि तिचा कथित बॉयफ्रेंड झहीर इक्बाल अनेकवेळा सोशल मीडियावर एकत्र दिसले आहेत. झहीरच्या वाढदिवसानिमित्य तिने काही फोटो शेअर केले होते. त्यातही दोघे मजामस्ती करताना दिसले होते.

हेही वाचा - निलंबित भाजप प्रवक्त्या नुपूर शर्माच्या समर्थनार्थ उतरली कंगना रणौत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.