ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut : कंगना रणौतची सुप्त इच्छा, विद्युत जामवालसोबतचा थ्रो बॅक व्हिडिओ शेअर - throwback video with Vidyut Jammwal

एक जुना व्हिडिओ शेअर करत कंगना रणौतने विद्युत जामवालसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तिला वाटते की ते दोघे एकत्र चांगले दिसतात आणि अ‍ॅक्शन चित्रपटासाठी त्यांची जोडी कमाल करु शकते.

Kangana Ranaut
कंगना आणि विद्युत दामवाल
author img

By

Published : Aug 1, 2023, 7:43 PM IST

मुंबई - बॉलिवूड क्वीन कंगना रणौतने फॅशन डिझायनरसाठी रॅम्पवर चालताना स्वतःचा आणि विद्युत जामवालचा एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करत कंगनाने दिग्दर्शकांना अ‍ॅक्शन चित्रपटात विद्युत जामवालसह कास्ट करण्याचे जणू संकेतच दिले आहेत. फिटनेस फ्रीक असलेला विद्युत त्याच्या जबरदस्त अ‍ॅक्शन व स्टंटसाठी ओळखला जातो. कंगनानेही अनेक अ‍ॅक्शन चित्रपटातून काम करत यापूर्वी आपला इंटरेस्ट असल्याचे दाखवून दिले आहे.

इंस्टाग्राम स्टोरीजवर अभिनेत्री कंगना रणौतने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती पारंपारिक पोशाखात कमांडो फेम अभिनेता विद्युतसोबत रॅम्पवर चालताना दिसत आहे. कंगना रणौत हस्तीदंती लेहेंग्यात रॅम्पवर चालताना सुंदर दिसत आहे. यावेळी तिने घातलेल्या दागिन्यांचीही लोकांनी प्रशंसा केली आहे.

कंगनाचा विद्युत जामवालसोबत थ्रोबॅक व्हिडिओ

या व्हिडिओत विद्युत जामवाल थ्री-पीस कोट पँटमध्ये शार्प दिसत होता. विद्युतने ग्रे शर्ट आणि गडद निळा ब्लेझर घातला होता. या थ्रोबॅक व्हिडिओत रॅम्पवर चालताना दोघेही एकत्र जबरदस्त दिसत होते. व्हिडिओ शेअर करताना कंगनाने लिहिले, 'छान जोडी... कोणीतरी आम्हाला अ‍ॅक्शन चित्रपटात एकत्र कास्ट करावे...'

कंगनाने विद्युतसोबत अ‍ॅक्शन चित्रपटात काम करण्याची इच्छा दाखवल्याने दोघांच्याही चाहत्यांना हे आवडले आहे. विद्युतने यापूर्वी 'फोर्स' या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा पदार्पण केले होते. या चित्रपटाचे निर्मिते विपुल अमृतलाल शाह यांनी शूटिंगदरम्यान विद्युतची क्षमता लक्षात घेतली आणि त्याला मुख्य कलाकार म्हणून 'कमांडो'ची ऑफर दिली. त्यानंतर असंख्य सिनेमातून त्याने आपली अ‍ॅक्शन हिरो ही नवी ओळख निर्माण केली आणि जपली आहे.

दरम्यान, कंगना रणौतने 'धडक'मध्ये तिचा अ‍ॅक्शन अवतार दाखवला होता. यात तिने भरपूर स्टंट्स केले होते. मणिकर्णिकामधील तिच्या भूमिकेसाठी कंगनाने घोडेसवारी, तलवारबाजीचे प्रशिक्षणही घेतले होते. आता ती आगामी 'तेजस' आणि 'इमर्जन्सी' या चित्रपटातून झळकणार आहे. यातील इमर्जन्सी हा चित्रपट तिने दिग्दर्शित केला असून याची निर्मितीही तिच्या मणिकर्णिका बॅनरखाली करण्यात आली आहे.

हेही वाचा -

१. Rocky aur rani kii prem kahaani : धर्मेंद्रसोबतच्या लिपलॉक सीनवर शबाना आझमीने केला खुलासा...

२. Suhana Goa holiday : सुहाना खानची गोवा डायरी, बीच हॉलिडेचे सुपरफ्रेश फोटो

३. Chandu Champion First Look : कार्तिक आर्यनचा आगामी 'चंदू चॅम्पियन'चा फर्स्ट लूक रिलीज...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.