मुंबई - सध्या नेटविश्वात एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे 'महाराष्ट्राची अप्सरा' सोनाली कुलकर्णीच्या घरात पाळणा हलणार का? त्यापाठी कारणही तसेच आहे. एका टॉक शो मध्ये सोनाली कोणालातरी फोन करून 'आता नाही येऊ शकत, कारण गुड न्यूज आहे', असं सांगताना दिसली. सोनाली कुलकर्णीने दिली गुडन्यूज? हे सध्या ट्रेडींग आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
लॉकडाऊनमध्ये रजिस्टर मॅरेज केल्यानंतर मागील वर्षी सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरसोबत लंडनमध्ये धुमधडाक्यात लग्न केले. आता नुकतीच सोनाली कुलकर्णीने 'पटलं तर घ्या विथ जयंती' या टॉकशोमध्ये एक गुडन्यूज दिली आहे. 'आता नाही येऊ शकत, कारण गुड न्यूज आहे' असे तिने सांगितले. त्यामुळे आता सोनालीच्या घरातही पाळणा हलणार का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
आता नक्की ही गुडन्यूज काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. त्याच शो मध्ये सोनालीने तिच्यासोबत घडलेले अनेक किस्से शेअर केले. सिनियर सोनाली कुलकर्णी आणि तिच्यामध्ये लोकांचा कसा गोंधळ व्हायचा, याचाही धमाल किस्सा तिने यावेळी सांगितला. तिच्या आवाजावरून तिला अनेकदा नाकारण्यात आले, हेसुद्धा तिने यावेळी सांगितले. हा एपिसोड प्रेक्षकांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर पाहता येणार आहे.
सोनालीचा साधेपणाने झालाय विवाह - सोनाली कुलकर्णीच्या लग्नाला आता अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने आपला विवाह सोहळा अत्यंत साधेपणाने साजरा केला. खरंतर लग्न म्हणजे दोन कुटुंबांचे विलीनीकरण. भारतीय संस्कृतीप्रमाणे हा सोहळा नेहमीच थाटामाटात साजरा केला जात आलाय. परंतु गेल्या चार वर्षापासून कोरोना महामारीमुळे ओढवलेल्या संकटामुळे सर्वांनाच ‘गर्दी’ वर्ज्य झाली होती. अति सांसर्गिक असलेल्या या रोगामुळे एकमेकांना भेटणेही मुश्किल झालं होतं. लग्न समारंभांत होणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठी, जेणेकरून कोरोना पसरू नये, शासनाने लग्नात उपस्थित राहणाऱ्या व्यक्ती संख्येवर निर्बंध आणले. लग्न करायचेच असल्यास फक्त ५० लोकांना, नवरा-नवरी सकट, तिथे उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. तसं पाहायला गेलं तर लग्न समारंभ हा महिलांसाठी खास असतो आणि नवरी मुलींसाठी तर एकदम स्पेशल. परंतु कोरोना या कर्दनकाळाने अनेक मुलींच्या इच्छा-आकांशावर पाणी फेरले.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे कुणाल बेनोडेकरसोबत लग्न - महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी आता बनलीय सौ. सोनाली कुणाल बेनोडेकर. कुणाल हा दुबईत व्यवसाय करतो आणि त्याची आणि सोनालीची भेट कॉमन फ्रेंड्सच्या पार्टीत झाली होती. दोघांनाही एकमेकांची कंपनी आवडू लागली आणि पुढे घडत असलेल्या भेटींचं रूपांतर प्रेमात झालं. गेल्या लॉकडाऊन मध्ये ती दुबईत अडकली होती आणि सोनाली आणि कुणाल ने लंडन ला लग्न करण्याचे ठरविले होते. परंतु कोरोना आडवा आला. पण सर्वात महत्वाचे म्हणजे लग्न झालं म्हणून सोनाली खूप खुश आहे. सोनाली आता निर्माती पण झाली असून तिने ‘हाकामारी’ या चित्रपटाची निर्मिती, अक्षय बर्दापूरकरांच्या प्लॅनेट मराठी सोबत, केली आहे. लग्नानंतर सोनाली मोजकेच पण ताकदीच्या भूमिका असलेले चित्रपट करणार आहे.
हेही वाचा - Pathaan In Pakistan : बंदी असतानाही पठाणचा पाकिस्तानात शो, देशात खळबळ