ETV Bharat / entertainment

Akanksha Dubey Suicide Case : ट्विटरवर रिप लिहिताच गायक समर सिंह ट्रोल, आकांक्षा दुबेच्या आईने केला गुन्हा दाखल

भोजपुरी चित्रपट अभिनेत्री आकांक्षा दुबेने वाराणसीतील हॉटेलमध्ये फाशी घेऊन जीव संपवला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी अभिनेत्रीच्या आईने गुन्हा दाखल केला आहे.

Akanksha Dubey Suicide Case
ट्विटरवर आरआयपी लिहिताच गायक समर सिंह ट्रोल
author img

By

Published : Mar 28, 2023, 11:10 AM IST

वाराणसी : भोजपुरी चित्रपट अभिनेत्री आकांक्षा दुबे हिने रविवारी वाराणसीतील सारनाथ भागातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आकांक्षा दुबेची आई मधू दुबे यांनी सारनाथ पोलिस ठाण्यात भोजपुरी गायक समर सिंह, त्याचा भाऊ संजय सिंह आणि दोन अज्ञात लोकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी गायक समर सिंहनेही त्याच्या ट्विटर अकाऊंटवर 'निशब्द, आरआयपी' लिहून श्रद्धांजली वाहिली. यानंतर लोकांनी त्याला जोरदार ट्रोल केले.

समर सिंहला ट्रोल केले जात आहे : सारनाथ पोलीस आता तांत्रिकदृष्ट्या पुरावे गोळा करण्यात गुंतले आहेत. आकांक्षा दुबेच्या मोबाईलवर समर सिंहचे मेसेज मिळाले आहेत. याशिवाय शेवटच्या कॉलमध्ये संजय सिंह आणि समर सिंह यांचे नंबरही सापडले आहेत. या सगळ्यामध्ये अशा काही गोष्टीही समोर आल्या, ज्यामुळे लोकांनी समर सिंह याच्यावर निशाणा साधला आहे. समर सिंहने आकांक्षा दुबेच्या मृत्यूनंतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर 'निशब्द, RIP, #akankshadubey' लिहून श्रद्धांजली वाहिली. यानंतर समर सिंहला लोकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. लोक त्याला मृत्यूसाठी जबाबदार धरू लागले आहेत.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिचा मृतदेह रविवारी हॉटेलच्या रुम नंबर 105 मध्ये आढळून आला. ही आत्महत्या मानून पोलीस या प्रकरणाचा तपास पुढे करत होते, मात्र या सगळ्यामध्ये आकांक्षा दुबेची आई मधू दुबे सोमवारी वाराणसीला पोहोचली. त्यांनी सारनाथ पोलिस ठाण्यात गायक समर सिंह, त्याचा भाऊ संजय सिंह आणि दोन अज्ञात लोकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

मारहाण करून ठार मारल्याचा आरोप : मधू दुबे यांनी समर सिंहवर आपल्या मुलीला मारहाण करून ठार मारल्याचा आरोपही केला आहे. आकांक्षाच्या मृत्यूनंतर त्याचा फोन स्विच ऑफ असल्याने समर सिंहही संशयाच्या भोवऱ्यात आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. यावेळी समर बिहारमध्ये असल्याचे मानले जाते. अटकेसाठी पोलीस बिहारलाही जाऊ शकतात. भोजपुरी गायक असण्यासोबतच समर सिंह हे समाजवादी पक्षाचे नेते देखील आहेत. अखिलेश यादव आणि सपाच्या इतर नेत्यांशी त्याची जवळीकही मानली जाते. होळीच्या दिवशी समाजवादी रंग असलेल्या गाण्यांचा अल्बमही रिलीज झाला. सध्या समर सिंह आणि त्याच्या भावाला पकडण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके तैनात करण्यात आली आहेत.

हेही वाचा : Allegations Against Danish Alfaj : गायक दानिश अल्फाज विरोधात पत्नीकडून छळ आणि लैंगिक शोषणाचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.