ETV Bharat / entertainment

Singer Armaan Malik And Aashna Shroff : गायक अरमान मलिकने केली एंगेजमेंटची घोषणा.... - डायमंड रिंग

'तरुणींच्या गळ्यातला ताईत' असलेला पार्श्वगायक अरमान मलिकच्या चाहत्यांचं काळीज विदीर्ण करणारी बातमी. अरमान मलिक लवकरच त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफसोबत एंगेजमेंट करणार आहे. या जोडप्याने सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आशना तिची सुंदर डायमंड रिंग दाखवताना दिसतेय.

Armaan Malik And Aashna Shroff
अरमान मलिक आणि आशना श्रॉफ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 2:11 PM IST

मुंबई: बॉलिवूडचा तरुण गायक अरमान मलिकने आज त्यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली आहे. अरमानने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही सुंदर फोटो शेअर केली आहेत. या फोटोमध्ये त्याच्याबरोबर त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफ दिसत आहे. फोटोमध्ये अरमान हा आशनाला गुडघ्यावर बसून 'टिपीकल रोमॅंटिक' अंदाजात प्रपोज करताना दिसत आहे. दुसऱ्या एका फोटोत ते एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. अरमानने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच या फोटोवर त्याचे चाहते प्रेमाचा वर्षाव करताना दिसतायत. अरमानला बॉलिवूड सेलिब्रिटींकडून देखील शुभेच्छा दिल्या जात आहेत.

एंगेजमेंटची घोषणा : अरमानची महिलांमध्ये फॅन फॉलोइंग खूप चांगली आहे. अरमान मलिक आणि आशना श्रॉफ एकमेकांना अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. दोघांनीही कधी आपलं नातं लपवण्याचा प्रयत्न केला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, दोघंही 2019 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे कपल 2017 मध्ये एकमेकांना भेटलं त्यानंतर दोघं प्रेमात पडले. अरमान आणि आशना ब्रेकअप देखील झालं होतं, मात्र त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये पुन्हा डेटिंग सुरू केली. दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो पोस्ट करत असतात. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना स्पॉट देखील केलं गेलंय.

बॉलिवूड सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन, टायगर श्रॉफ, ईशान खट्टर, तारा सुतारिया, नीती मोहन, झरीन खान, रिया चक्रवर्ती, हर्षदीप कौर, ईशा गुप्ता, आहाना कुमरा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनीही या जोडप्याचं अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांकडून येणाऱ्या शुभेच्छा अरमान आणि आशना दोघांनाही सुखावणाऱ्या आहेत. एका चाहत्याने आरमानच्या या पोस्टवर कमेंट करत म्हटलंय, 'ही जोडी खूप सुंदर दिसते' तर दुसऱ्या एका चाहत्याने म्हटलं की, 'अभिनंदन तुमच्या दोघांसाठी मी खूप खुश आहे'. एकूण अरमान-आशना हा आनंद चाहत्यांच्या साथीने साजरा करतायत, असं समजायला हरकत नाही.

अरमान मलिक आणि त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल : अरमानने तो ९ वर्षांचा असताना 'सारेगमापा'मध्ये भाग घेतला होता. या 'शो'तून तो रातोरात स्टार झाला. त्यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या मेहनतीच्या जोरावर खूप नाव कमावलं. आशना श्रॉफ एक फॅशन इन्फ्लुएंसर आणि ब्लॉगर आहे. तिला 'कॉस्मोपॉलिटन लक्झरी फॅशन इन्फ्लुएंसर ऑफ द इयर 2023' भारत पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. अनेकदा ती बॉलिवूडमधील अनेक पार्ट्यामध्ये दिसते.

हेही वाचा :

  1. Palak Tiwari And Ibrahim ali Khan : पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान डिनर डेटवर पुन्हा एकत्र
  2. Gadar २ vs OMG २ box office collection day १७ : 'गदर 2' बाहुबलीचा रेकॉर्ड मोडणार? जाणून घ्या कमाईची आकडेवारी
  3. Actor Shahrukh Khan : 'गॅम्बलिंग अ‍ॅप्सचा प्रचार बंद करा', शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर निदर्शने, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.