मुंबई - The Create Foundation : मुंबईतील 'राईल पदमसी क्रिएट फाउंडेशन'नं 'द पॉवर विदीन' हा दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव देणारा कार्यक्रम सादर केला. मुंबईतील अनेक स्पर्धकांनी या कार्यक्रमामध्ये कला - नाटक, नृत्य सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. या सर्व प्रतिभावान कलावंतांचा हुरुप वाढवण्यासाठी बोमन इराणी, नंदिता पुरी, सिद्धार्थ रॉय कपूर, जिम सारभ, रेल पदमसी, सुचित्रा पिल्लई, संध्या मृदुल, डेन्झिल स्मिथ, आसिफ अली बेग आणि अनुपमा वर्मा यांच्यासह अनेक नामवंत व्यक्तीनं हजेरी लावली होती. पर्ल पदमसी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ, 'द क्रिएट फाऊंडेशन' हे गेल्या अनेक वर्षांपासून अपंग आणि मूक बधिर मुलांसाठी काम करत आहे.
'द पॉवर विदीन' कार्यक्रम : शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत मुलांना योग्य शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना झाली. मुलांमध्ये नेतृत्व, संघकार्य, संवाद, आत्मविश्वास, आदी कौशल्यांचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहत संस्था काम करत आलीय. 'पॉवर विदीन'मध्ये, मुंबईतील अनेक शाळांमधून आलेल्या सतरा अंतिम स्पर्धकांनी स्टेजवर आपल्या कलाचे प्रदर्शन केलं. या स्पर्धेत मुलांसाठी वयोगटाच्या दोन श्रेणी होत्या - 7 ते 9 वर्षे आणि 10 ते 13 वर्षे, 8 ते 18 वर्षे. या वयोगटातील मुलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
'द क्रिएट फाऊंडेशन'बद्दल बोलताना कलाकारांनी सांगितलं : या कार्यक्रमाबद्दल आणि 'द क्रिएट फाऊंडेशन'ने हाती घेतलेल्या उपक्रमाविषयी, निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर सा्ंगितलं, 'मला वाटलं की हे आश्चर्यकारकपणे प्रेरणादायी आहे. माझी एक सुंदर दुपार होती. मुलांनी खूप छान शो सादर केला!आणि मला एवढंच सांगायचं आहे की 'क्रिएट फाउंडेशन' मुलांना अशा प्रकारे व्यक्त होण्याची संधी देण्यासाठी असे अविश्वसनीय कार्य करत आहे!' अभिनेता जिम सारभनंही 'मला स्टेजवर येणं खूप खास वाटतं आणि त्याव्यतिरिक्त, मला परफॉर्मन्सचा खूप आनंद झाला. मुलांचा आत्मा आणि त्यांनी दाखवलेली सर्जनशीलता खरोखरच अविश्वसनीय आहे! मला आशा आहे की पुढच्या वर्षी तेच काम करण्यासाठी मी परत येईन!' या शब्दांत भावना व्यक्त केल्या. तसंच यावेळी अभिनेत्री सुचित्रा पिल्लईनं 'दिल चाहता है' या चित्रपटातील 'कोई कहे कहता रहे' हे गाणं उपस्थित सर्व मुलांसाठी गायलं.
बोमन इराणीनं व्यक्त केल्या भावना : या कार्यक्रमात पहिल्या अभिनयाची आठवण करून देताना बोमन इराणी सांगितलं, माझा एक फोटोग्राफी स्टुडिओ होता. हा स्टुडिओ दोन ब्लॉक्सच्या अंतरावर होता. एके दिवशी श्यामक दावर स्टुडिओत आले. त्यानंतर त्यांनी मला अभिनय करण्यास सांगितलं. सहा महिन्यांनंतर,तो पुन्हा आला आणि मला अॅलिक पदमसी यांच्या कार्यालयात घेऊन गेला, जिथे मी ऑडिशन दिलं आणि मला त्यांच्या रोशनी या नाटकात भूमिका मिळाली, आम्ही याच सभागृहात पदार्पण केलं होतं. आज इथेच उभे आहोत (सोफिया भाभा सभागृह) इथेच मी राईलला भेटलो, तेव्हा मी ३५ वर्षांचा होतो आणि तिला आश्चर्य वाटलं की मी छोट्या कलाकारांच्या क्लबमध्ये का सहभागी झालो नाही! ती हसली. त्यानंतर त्यानं पुढं सांगितलं, ज्या क्षणी तुम्ही रंगमंचावर पाऊल ठेवता, तेव्हा तुम्ही विसरा की तुम्ही कोणत्या समुदायाचे किंवा पार्श्वभूमीचे आहात. याचा काही फरक पडत नाही! महत्त्वाचं म्हणजे, ज्या क्षणी तुम्ही रंगमंचावर पाऊल ठेवता, तुम्ही किती कल्पकतेने श्रीमंत होऊ शकता, शक्य तितके श्रीमंत होण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. ज्या क्षणी लहान मूल त्या रंगमंचावर पाऊल ठेवते, तेव्हा त्याला किंवा तिला जगाच्या राजा आणि राणीसारखे वाटत असते.
राईल पदमसी यांनी व्यक्त केल्या भावना : दरम्यान अभिनेता डेन्झिल स्मिथ, आसिफ अली बेग, अनुपमा वर्मा आणि पत्रकार नंदिता पुरी यांनी मुलांना शक्य तितक्या प्रकारे आनंदित करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. थिएटर दिग्गज आणि होस्ट राईल पदमसी यांनी यावेळी म्हटले, 'क्रिएटमध्ये, आमचा मूळ विश्वास आहे. प्रत्येक व्यक्तीकडे अद्वितीय प्रतिभा आणि अप्रयुक्त क्षमता असते. योग्य संधी देणं हे कर्तव्य आम्ही मानतो. आमची दृष्टी सर्वसमावेशक जगाची उभारणी करणे आहे.
हेही वाचा :