ETV Bharat / entertainment

शुभमन गिलने सारा अली खानसोबतच्या डेटिंगच्या अफवांना दिली हवा, म्हणतो : 'सारा दा सारा सच बोल दिया' - सोनम बाजवा चॅट शो दिल दियां गल्लन

शुभमन गिल अलीकडेच सोनम बाजवाच्या चॅट शो दिल दियां गल्लनमध्ये दिसला होता. यावेळी त्याने त्याची कथित गर्लफ्रेंड सारा अली खानच्या नात्याबद्दलचा खुलासा केला. या वर्षी ऑगस्टमध्ये सारा आणि शुबमनच्या डेटिंगबद्दलच्या अफवा पसरू लागल्या होत्या जेव्हा ते एकत्र डिनर करताना दिसले होते.

शुभमन गिल आणि सारा अली खान
शुभमन गिल आणि सारा अली खान
author img

By

Published : Nov 16, 2022, 12:32 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल नुकताच एका पंजाबी चॅट शोमध्ये आला होता. यावेळी त्याने त्याची कथित गर्लफ्रेंड सारा अली खानच्या नात्याबद्दलचा खुलासा केला. शुभमन नुकताच सोनम बाजवाच्या चॅट शो 'दिल दियां गल्लन'मध्ये दिसला आणि त्यानंतर झालेल्या संभाषणात पंजाबी अभिनेता सोनमने क्रिकेटर शुभमनला प्रश्न केला की बॉलिवूडमधील सर्वात फिटेस्ट कलाकार कोण आहे? यावर त्याने ‘सारा’ असे उत्तर दिले.

शुभमन गिल आणि सारा अली खान
शुभमन गिल आणि सारा अली खान

त्याच्या खुलाशानंतर सोनमने शुभमनला विचारले की तो अभिनेत्री सारा अली खानला डेट करत आहे का, यावर त्याने उत्तर दिले, "कदाचित." यावर सोनमने त्याला म्हटले की "सारा का सारा सच बोलो (सगळं खरं सांग)" असे म्हणत सत्य बोलण्यास सांगितले. यावर शुभमनने उत्तर दिले, "सारा दा सारा सच बोल दिया (मी संपूर्ण खरं सांगितले आहे). कदाचित, कदाचित नाही."

या वर्षी ऑगस्टमध्ये सारा आणि शुबमनच्या डेटिंगबद्दलच्या अफवा पसरू लागल्या होत्या जेव्हा ते एकत्र डिनर करताना दिसले होते. एका टिक-टॉक युजरने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि तो व्हायरल झाला. त्यांच्या नातेसंबंधाच्या स्थितीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांचे लक्ष व्हायरल क्लिपने वेधून घेतले होते.

मात्र, सारा किंवा शुभमन या दोघांनीही त्यांच्या नात्याला दुजोरा दिला नाही. शुभमनच्या आधी, सारा तिच्या 'लव्ह आज कल' चित्रपटाचा सह-अभिनेता कार्तिक आर्यनसोबत अफवामध्ये चर्चेत होती, ज्याची दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या चॅट शो कॉफी विथ करण सीझन 7 मध्ये पुष्टी केली होती.

दरम्यान, वर्क फ्रंटवर, सारा पुढे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी अनटाइटल्ड रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात विकी कौशलसोबत दिसणार आहे. तिच्या हातामध्ये विक्रांत मॅसी आणि चित्रांगदा सिंग यांच्यासोबत गॅसलाइट देखील आहे.

दरम्यान, शुभमनला त्याच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ, गुजरात टायटन्सने देशांतर्गत T20 लीगच्या पुढील हंगामासाठी कायम ठेवले आहे. 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी T20I आणि ODI मालिकेतही तो भारताच्या वतीने खेळणार आहे.

हेही वाचा - 'बिग बॉस 16'च्या घरात साजिद खान बनला नवा कर्णधार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.