ETV Bharat / entertainment

Cricketer Shubman Gill : 'हमारी भाभी कैसी हो', म्हणाऱ्यांना शुभमन गिलचा जबरदस्त शॉट, 'क्रश'वरुन चाहते संभ्रमात - सारा अली खान सोबत डेटिंग

शुभमन गिल नेमका कोणाच्या प्रेमात पडलाय यावरुन सोशल मीडियात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. त्याचे सारा अली खान सोबत डेटिंग सुरू आहे अशी चर्चा असताना त्याने एका मुलाखतीत रश्मिका मंदानाचे नाव घेतल्यामुळे चाहत्यांना संभ्रमात पाडले आहे.

Cricketer Shubman Gill
क्रिकेटर शुभमन गिल
author img

By

Published : Mar 7, 2023, 3:48 PM IST

मुंबई - भारताचा उगवता सितारा म्हणून क्रिकेटर शुभमन गिलकडे पाहिले जाते. आपल्या धडाकेबाज फलंदाजीने तो विरोधी गोलंदाजांची भंबेरी उडवून देतो. अलिकडे त्याच्या डेटिंगची खूप चर्चा होत असते. काही वर्षापूर्वी त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्यानंतर सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तंडूलकरसोबत त्याचे नाव जोडले जात होते. मात्र त्याच्या हालचालीवर नजर ठेवून असलेल्या फॉलोअर्सना त्यात अधिक काही गवसले नाही. मात्र तो सारा अली खानसोबत रेस्टॉरंटमध्ये दिसल्यानंतर ही सारा वेगळीच असल्याचा जावई शोध चाहत्यांनी लावला होता.

अलिकडेच एका सामन्यात फिल्डिंगसाठी तो बाऊंड्रीवर असताना स्टेडियममधून एकच गलका झाला. जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाली. ती घोषणा होती, 'हमारी भाभी कैसी हो, सारा भाभी जैसी हो'. गंमत म्हणजे ही घोषणा सुरू असताना तिथे विराट कोहलीही फिल्डींग करत होता. त्यानेही शुभमन गिलची बरीच फिरकी घेतली आणि घोषणा देणाऱ्यांना आणखी चेतवले. यामुळे शुभमन आणि सारा अली खान यांच्यात काही तरी नाते आहे यावर शिक्का मोर्तब करणे सुरू झाले असताना शुभमन गिलने चेंडू भलतीकडेच भिरकवला आहे.

अलिकडेच एका मुलाखतीच्या दरम्यान शुभमनला त्याच्या क्रशबद्दल विचारण्यात आले, यावर तो चक्क लाजला. पण खोदून विचारल्यानंतर त्याने रश्मिका मंदान्नाचे नाव घेतले. त्यामुळे सोशल मीडियावर आता रश्मिका आणि शुभमनच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. हे नाव त्याने घेतले असले तरी ही सुध्दा शुभमनची एक चाल असू शकते, असा कयास बांधला जात आहे. कारण त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की, तुझी क्रश कोण आहे, त्यावर त्याने रश्मिकाचे नाव घेतले असले तरी तिला 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मुख्य विषयावरुन भलतीकडे नेण्याचा त्याने प्रयत्न केला असू शकतो, असे म्हणायला वाव आहे. कारण तो अनेकवेळा सारा अली खानसोबत दिसला आहे पण अद्याप एकदाही तो रश्मिका सोबत स्पॉट झालेला नाही.

हेही वाचा - Amitabh Bachchan Holi Wishes : अमिताभ बच्चन यांनी होळीच्या शुभेच्छांसह दिली आरोग्याची अपडेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.