मुंबई - २००७ मध्ये नवी दिल्ली येथे एका चॅरिटी कार्यक्रमात रिचर्ड गेरे याने शिल्पा शेट्टीचे स्टेजवर चुंबन घेतले होते. याचा त्रास अजूनही शिल्पाचा पिच्छा पुरवत आहे. शिल्पा शेट्टीने तिचे वकील प्रशांत पाटील यांच्यामार्फत बॅलार्ड पिअर, मुंबई, मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या जानेवारीच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे. यात कोर्टाने तिला या घटनेमुळे झालेल्या अश्लीलतेच्या खटल्यातून मुक्त केले होते.
एप्रिलमध्ये अलवर, राजस्थान पोलिसांनी मॅजिस्ट्रेटच्या आदेशाविरुद्ध सत्र न्यायालयात संपर्क साधला होता आणि आपल्या याचिकेत मॅजिस्ट्रेटने शिल्पाला डिस्चार्ज करण्यात चूक केल्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेणे किंवा चुंबन घेण्याची परवानगी देण्याचे तिचे कृत्य अश्लीलतेचे होते, असे म्हटले होते. पोलिसांनी असा युक्तिवाद केला होता की न्यायालयाने एफआयआर तपासल्यास अभिनेत्रीविरुद्ध प्रथमदर्शनी खटला तयार करण्यात आला आहे.
तिच्या उत्तरात शिल्पा शेट्टीने नमूद केले की ती तक्रारदाराच्या हातून दुर्भावनापूर्ण कार्यवाही आणि छळाची ती शिकार झाली होती आणि एक कलाकार म्हणून तिने नेहमीच सार्वजनिकरित्या जबाबदारीने काम केले आहे. तक्रारदार स्वस्त प्रसिद्धीसाठी कोर्टात जात असल्याचा आरोपही तिने केला आहे.
2007 मध्ये अलवर पोलिसांशी संपर्क साधलेल्या तक्रारदाराने असा दावा केला होता की, हॉलिवूड स्टारने चुंबन घेतले असताना शिल्पाने विरोध केला नाही. शिल्पाने तिच्या याचिकेत असे सांगून या आरोपाचा प्रतिकार केला की यामुळे ती कोणत्याही गुन्ह्याचा कट रचणारी किंवा गुन्हेगार ठरत नाही.
हेही वाचा - IFFM 2022 : ऑस्ट्रेलियात अभिषेक बच्चन, कपिल देव फडकवणार भारतीय राष्ट्रध्वज