ETV Bharat / entertainment

Shehnaaz Gill on Niagara Falls : शहनाज गिलने आईसह लुटला नायगरा धबधब्याचा आनंद, पाहा व्हिडिओ - शहनाज गिल

Shehnaaz Gill on Niagara Falls : अभिनेत्री शहनाज गिल, तिच्या आगामी थँक यू फॉर कमिंगच्या प्रीमियरसाठी कॅनडामध्ये गेली आहे. या दौऱ्यातला एक व्हिडिओ तिनं चाहत्यांसाठी शेअर केलाय. यामध्ये ती आपल्या आईसह नायगर धबधबा एन्जॉय करताना दिसते.

Shehnaaz Gill on Niagara Falls
शहनाज गिलने आईसह लुटला नायगरा धबधब्याचा आनंद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 7:54 PM IST

मुंबई - Shehnaaz Gill on Niagara Falls : थँक यू फॉर कमिंग या आगामी चित्रपटाची टीम सध्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट (TIFF) महोत्सवासाठी रवाना झाली आहे. महिला केंद्रीत या चित्रपटाची नायिका आणि प्रसिद्ध पंजाबी गायिका शहनाज गिल या टीममध्ये आहे. या दौऱ्यातून वेळ काढून तिने जग प्रसिद्ध नायगर धबधब्याला भेट दिला आणि निसर्गाचा हा अनोखा चमत्कार अनुभवला. शहनाझने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ चाहत्यांसाठी टाकला आहे. तिच्या चाहत्यांना अपडेट देण्यासाठी तिनं तिच्या परदेश दौऱ्यातील झलक शेअर केली आहे.

शहनाजने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या आईसोबतच्या एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्येअभिनेत्री शहनाज गिल कमीतकमी मेकअपसह खूपच मोहक दिसतेय. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (TIFF ) महोत्सवाच्या रेड कार्पेटवर जलवा दाखवल्यानंतर तिने या सुंदर ठिकाणाला भेट दिलीय. या व्हिडिओमध्ये, गिलने बेबी पिंक हुडी परिधान केल्याचं दिसतंय.

आकाशातील सप्तरंगी इंद्रधनुष्याकडे निर्देश करताना व्हिडिओच्या सुरुवातीला शहनाज दिसते. धबधब्याचा आनंद घेताना तिनं गुलाबी रेडकोटही घातल्याचं दिसतंय. तिच्यासोबत तिची आई परमिंदर कौर गिल आनंदात साथ देताना दिसते. कॉफीचा मग हातात घेऊन तिने या सुंदर दिवसाची सांगता केलीय.

शहनाजने व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लगेचच तिचे चाहते आणि इंडस्ट्रीतल्या मित्रांनी रेड हार्ट इमोटिकॉन्ससह कमेंट सेक्शनमध्ये हाऊसफुल्ल गर्दी केली. तिच्या दिसण्यावर भरपूर प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

यंदाच्या सध्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (TIFF) थँक यू फॉर कमिंग हा एकमेव भारतीय फीचर चित्रपट दाखवण्यात आला. एकट्याने स्त्री म्हणून जगताना प्रेम आणि आनंदाचा सोध घेणाऱ्या स्त्रीची कथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. शहनाजसह या चित्रपटात भूमी पेडणेकर, शिबानी बेदी, डॉली सिंग आणि कुशा कपिला या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

राधिका आनंद आणि प्रशस्ती सिंग लिखित आणि करण बुलानी दिग्दर्शित हा चित्रपट 6 ऑक्टोबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन भारतासह जगातील अनेक शहरात करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड आणि अनिल कपूर फिल्म कम्युनिकेशन नेटवर्क प्रा. लि. ने या चित्रपटाची निर्मिती केलीय.

हेही वाचा -

१. ICC World Cup 2023: बिग बी, सचिन तेंडुलकर नंतर बीसीसीआयने रजनीकांतला दिलं गोल्डन तिकीट

२. Ganesh Chaturthi 2023: आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, अनन्या पांडेसह सेलेब्रिटींनी दिल्या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा

३. Ganesh Festival Celebration of Celebrities: पाहा 'या' सेलिब्रेटींच्या घरी झालंय गणपती बाप्पाचं आगमन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.